Party Hangover : पार्टीचा हॅंगओवर कसा उतरवाल?
Marathi December 29, 2025 08:26 PM

2025 हे वर्ष सुरु होण्यासाठी आता काही तासच शिल्लक राहिले आहेत. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. काही ठिकाणी न्यू इयर पार्टीची तयारी सुरू देखील झाली असेल. पार्टी सेलिब्रेशननंतर दुसऱ्या दिवशी पार्टीचा त्रास होतो. डोकेदुखी, मळमळ, पोटदुखी आदी शारीरिक समस्या सुरू होतात, ज्याला हँगओव्हर असे म्हटले जाते. मद्याच्या अतिसेवनामुळे हा त्रास होतो. आज आपण पार्टीचा हँगओव्हर उतरवण्याचे भन्नाट उपाय जाणून घेऊयात.

नारळ पाणी – हँगओव्हर उतरवण्यासाठी नारळ पाणी उत्तम आहे. मद्यपान केल्यावर डोके जड होणे, हृदयाची गती वाढते अशा समस्यांवर नारळ पाणी उत्तर आहे.

कॉफी किंवा चहा – पार्टीचा हँगओव्हर उतरवण्यासाठी सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफी घ्या. यातील कॅफिनमुळे हँगओव्हर उतरतो.

हेही वाचा – New Year 2026 Party Outfit Ideas: न्यू- इयर पार्टीला ट्राय करा ‘हे’ आऊटफिट्स; मिळेल ग्लॅमरस लूक

आल्याचा तुकडा – आल्याचा तुकडा गरम पाण्यात टाकून पाणी प्यायलास मद्यपानाचा हँगओव्हर राहत नाही. आल्यातील इंफ्लेमेटरी गुणधर्म उलटी, अपचन समस्या दूर करतात.

केळी – केळी पार्टीचा हँगओव्हर उतरवण्यासाठी केळी खावीत. केळीतील पोटॅशियम पोटाला आराम देते आणि एनर्जी लेव्हल वाढवते.

लिंबू सरबत – पार्टीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर लिंबू पाण्याचे सेवन करावे. यातील व्हिटॅमिन C दारूचा हँगओव्हर लवकर उतरवण्यास मदत करते.

पुदिना – हँगओव्हर उतरवण्यासाठी पुदिना उपयुक्त आहे. यासाठी पुदिन्याची 3 ते 4 पाने गरम पाण्यात टाकून उकळवा. यामुळे गॅस, ऍसिडिटी, मळमळ जाणवणार नाही.

(टीप – ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही आणि मद्यपानाला दुजोरा देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

हेही वाचा – Year Ender : 2025 मध्ये व्हायरल झाली भारतातील ही ठिकाणे, परदेशवासियांनाही पडली भूरळ

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.