पास्थळ महोत्सव उत्साहात
बोईसर, ता. २९ (वार्ताहर) : जाणता राजा फाउंडेशनतर्फे आयोजित ''पास्थळ महोत्सव २०२५''चे चौथे पर्व मंगळवारी (ता. २८) उत्साहात पार पडले. या महोत्सवात खाद्यपदार्थ, खेळणी व स्थानिक उत्पादनांच्या स्टॉल्ससह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. विद्यार्थ्यांचे सादरीकरण आणि ''खेळ पैठणीचा'' या विशेष आकर्षणामुळे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस मदत कक्षामुळे नियोजन शिस्तबद्ध होते. सामाजिक एकोपा जपणारा हा महोत्सव सर्वार्थाने यशस्वी ठरला.