वक्तृत्व स्पर्धेची विभागीय फेरी उत्साहात
esakal December 30, 2025 11:45 AM

डॉ. आंबेडकर स्मृतिदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा
कल्याण, ता. २९ (वार्ताहर) : छत्रपती शिक्षण मंडळ संस्थेच्या सर्व माध्यमिक विभाग व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतिदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेची विभागीय फेरी ज्ञानमंदिर हायस्कूलच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या स्पर्धेत अभिनव विद्यालय, विवेकानंद संकुल, नूतन ज्ञानमंदिर, ज्ञानमंदिर हायस्कूल अशा एकूण पाच शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. आठवी, नववी व दहावीमधील १५ विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थ्यांनी आपली वक्तृत्व कला, विचारांची स्पष्टता आणि सादरीकरणातील आत्मविश्वास यांच्या जोरावर अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक राहुल भालेराव होते. परीक्षक म्हणून डॉ. प्रेम जाधव व सहायक शिक्षक संजय वझरेकर यांनी अत्यंत सूक्ष्म व न्याय्य परीक्षण केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी सुधीर वंजारे, एस. के चौरे, प्रज्ञा अहिरे या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी (ता. ३) विवेकानंद संकूल येथे होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.