-पराग जगताप
ओतूर: डुंबरवाडी (ता.जुन्नर) गावच्या हद्दीत अहिल्यानगर कल्याण महामार्गावर शेतमजूर घेऊन चाललेल्या पिकअप व दुधाच्या टँकरची धडक होऊन झालेल्या अपघातात दोन शेतमजूर जागीच ठार झाले असून ३१ जण जखमी झाले असल्याचा प्रथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
Pune News:'ड्रायव्हर काकांच्या मृत्यूने विद्यार्थी हळहळले'; शाळेतील विद्यार्थ्यांना घरी साेडले अन् काय घडलं?या अपघात बाबत मिळालेली माहिती अशी की मंगळवारी ता.३० रोजी सकाळी आळकुटी येथील शेतकरी बनकरफाटा येथील मंजूर अड्यावरून शेती कामासाठी महिला वशेतमजूर पिकअप (क्र.एम एच १६ सी डी ८१५५) गाडीमध्ये सकाळी आठ वाजे दरम्यान अहिल्यानगर कल्याण महामार्गाने घेऊन आळेफाट्याच्या दिशेने चालला होता.तसेच याच मार्गावरून आळेफाटा बाजूकडून माळशेज घाटाच्या दिशेने पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्यादित कात्रज,पुणे ४६ हा दुधाचा टँकर क्र.एम एच १२ एक्स एम ६१२१ हा समोरून येत होता.या दोन्ही वाहनांचा डुंबरवाडी गावच्या हद्दीत हॉटेल अभिजीत जवळ भिषण अपघात झाला.या अपघात दोन शेतमजूर महिला जागीच ठार झाल्या.तर इतर अनेक जण जखमी झाले.
पघाताची माहिती मिळताच डुंबरवाडीचे पोलिस पाटील किरण भोर यांनी स्थानिक तरूणांसह अपघात ग्रस्ताना मदत करून ओतूर पोलिसांना माहिती दिली.ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक एल जी दाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक युवराज जाधव, पोलिस हवालदार सुरेश गेंगजे,विलास कोंढावळे,भरत सुर्यवंशी,धनराज पालवे, देविदास खेडकर,शामसुंदर जायभाई,ज्योतीराम पवार व इतरांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली.तसेच वाहतूक सुरळीत केली.
सदर अपघात ग्रस्त रूग्णांना तातडीचे उपचायासाठी एम डी ऍम्ब्युलन्सचे दिपक मंडलिक,रुद्र ऍम्ब्युलन्सचे कुणाल डुंबरे,मुक्ताई ऍम्ब्युलन्सचे गणेश आमले,दत्ता शिंदे ऍम्ब्युलन्सचे गणेश दाईत व टोलनाक्यावरील ऍम्ब्युलन्स यांनी सर्वांनी तातडीने सर्व रुग्णाना रूग्णवाहिकेत घेऊन दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसीला मुदतवाढ, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकाचवेळी खात्यात जमा होणार..सदय जखमी रुग्णांना आळेफाटा येथील माऊली हॉस्पिटल सात रुग्ण, युनिक हॉस्पिटल मध्ये दोन रूग्ण तसेच ओतूर येथील निरामय हॉस्पिटल मध्ये दोन गंभिर जखमी रुग्णांना व ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात २२ रुग्णाना उपचारासाठी दाखल करण्यात आले.यातील आळेफाटा येथे उपचारासाठी नेण्यात आलेल्या रुग्णांपैकी दोन महिला मयत झाल्या असल्याची माहिती रुद्र ऍम्ब्युलन्सचे कुणाल डुंबरे यांनी दिली.