निरगुडसर, ता. ३० ः खडकी (ता. आंबेगाव) येथील काळभैरवनाथ, सौ. लक्ष्मीबाई बाबूराव बांगर विद्यालयात नन्ही कली उपक्रमांतर्गत नांदी फाउंडेशनच्या माध्यमातून इयत्ता सहावी ते दहावीतील ९१ मुलींना टी-शर्ट, बूट, मोजे, वही, पेन इत्यादी शालेय साहित्यासह सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले.
काळभैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश ठाकूर व नन्ही कलीच्या समन्वयक पुनम भोर यांच्या हस्ते शालेय साहित्याचे किट वाटप करण्यात आले. शालेय साहित्य वाटपासाठी नांदी फाउंडेशनला मदत करणारे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड व थ्री एम यांच्या विशेष योगदानातून शालोपयोगी साहित्य देण्यात आल्याची माहिती नांदी फाउंडेशनच्या कार्यक्रम अधिकारी वर्षा चौधरी यांनी दिली.
यावेळी नन्ही कली मनस्वी पोखरकर, स्वरा थोरात व तनिष्का बुळे यांनी मनोगत व्यक्त करून नांदी फाउंडेशनचे आभार मानले. साहित्य वाटप कार्यक्रमाचे नियोजन मंगल सोनार, माणिक हुले, माधुरी थोरात, प्रभाकर झावरे, शरद पाबळे, ज्योत्स्ना खेडकर, रूपाली ठाकूर, धम्मपाल कांबळे यांनी केले. कार्यक्रमासाठी अरुण सरोदे, संतोष खालकर, संजय नेहरे, रामदास भांड, रामदास लबडे व लक्ष्मण फलके यांचे सहकार्य लाभले.