सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर) : बोदवड (ता. सिल्लोड) येथील भुसार मालाचे व्यापारी तुकाराम माधवराव गव्हाणे (वय ५५) यांचे अपहरण करून एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करीत त्यांचा निर्घृण खून (Maharashtra Ransom Killing) केल्याची घटना सोमवारी (ता.२९) समोर आली. ते शनिवारी (ता.२७) रात्रीपासून बेपत्ता होते.
चाळीसगाव घाटात सोमवारी (ता.२९) सकाळी त्यांचा मृतदेह आढळला. याप्रकरणी पाच संशयितांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. तुकाराम गव्हाणे हे बोदवड येथील कृषी सेवा केंद्रचालक होते.
उंडणगाव (ता. सिल्लोड) येथील व्यापारी मुकेश पंडित यांच्याकडून शेतमालाचे एक लाख रुपये घेण्यासाठी ते शनिवारी दुपारी दुचाकीने (एमएच २० जीए ०४४३) गेले होते. तेथून बोदवडला परतले पण रात्री उशिरापर्यंत घरी पोचले नाही. कुटुंबीयांनी सातत्याने प्रयत्न करूनही संपर्क झाला नाही. त्यानंतर ते बेपत्ता झाल्याची माहिती त्यांचा मुलगा कृष्णा याने अजिंठा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा दिली. त्यानंतर कृष्णा घरी परतला.
दरम्यान, कुटुंबीय, पोलिसांकडून शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असताना रविवारी (ता. २८) दुपारी तुकाराम गव्हाणे यांच्या मोबाइलवरून अन्य व्यक्तीचा त्यांच्या नातेवाइकांच्या मोबाइलवर फोन आला. एक कोटी रुपये घेऊन छत्रपती संभाजीनगर येथे येण्यास त्याने सांगितले. काही कालावधीनंतर पुन्हा फोन आल्यानंतर रक्कम घेऊन छत्रपती संभाजीनगर येथील बसस्थानकावर येण्यास सांगितले. त्यानंतर वारंवार केलेल्या फोनवरून संबंधित व्यक्तीने पैसै घेऊन येण्यासाठीची वेगवेगळी ठिकाणे सांगितली.
लोकप्रिय अभिनेत्रीनं संपवलं जीवन; अभिनयाच्या दुनियेत मोठं स्वप्न उराशी बाळगलेल्या 'नंदिनी'चा दुर्दैवी अंत, चाहत्यांमध्ये शोककळात्यात छत्रपती संभाजीनगरातील बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, टीव्ही सेंटर, आंबेडकर चौक, बाबा पेट्रोल पंप आदी ठिकाणांचा समावेश होता. पैसे न दिल्यास तुकाराम गव्हाणे यांना मारून टाकण्याची धमकी दिली जात होती. यासंदर्भातील माहिती नातेवाइकांकडून अजिंठा पोलिसांना दिली जात होती. पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांसोबत एक कोटी रुपये घेऊन छत्रपती संभाजीनगर गाठले. परंतु सायंकाळी पुन्हा मोबाइलवर फोन आला आणि ‘आता पैसे नकोत, परत घेऊन जा’, असे सांगून फोन कट करण्यात आला.
पोलिसांनी शोध सुरू केला असता चाळीसगाव घाटातील म्हसोबा मंदिर परिसरातील दरीत तुकाराम गव्हाणे यांचा सोमवारी (ता. २९) सकाळी मृतदेह सापडला. उत्तरीय तपासणीसाठी तो कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. बोदवड येथे रात्री उशिरा पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.
'निवारा ट्रस्ट'च्या नावाखाली गोरगरिबांना 22 लाखांचा गंडा; पूजा भोसलेला 3 वर्षांनी अटक, कोल्हापुरात वेगवेगळ्या हॉलमध्ये लोकांना बोलवत होती! असा घटनाक्रमउंडणगाव (ता. सिल्लोड) येथून शनिवारी अपहरण
रविवारी दुपारनंतर अपहृताच्या फोनवरून वारंवार कॉल
पैशांची मागणी, खुनाची धमकी
गावातील हालचालींची एक जण देत होता माहिती
पैसे घेण्यासाठी अनेक ठिकाणे बदलली
पोलिस नातेवाइकांसह पैसे घेऊन रवाना
‘आता पैसे नकोत’ असा फोन
सोमवारी आढळला मृतदेह
पाच जणांना बेड्या