31 डिसेंबरला मुसळधार पाऊस, तब्बल 5 राज्यात अलर्ट जारी, पुढील 24 तासात…
Tv9 Marathi December 30, 2025 05:46 PM

वातावरणात सातत्याने बदल होताना दिसतोय. सकाळी कडाक्याची थंडी तर दुपारी कडक उन्ह अशी स्थिती बघायला मिळतंय. देशातील काही भागांमध्ये अजूनही पाऊस कोसळताना दिसत आहे. उत्तरेकडे थंडी वाढल्याने राज्यात थंड लहरी येत असल्याने पारा घसरताना दिसत आहे. आता राज्यात लवकर गुलाबी थंडीचा आगमन होणार आहे. जवळपास संपूर्ण डिसेंबर महिना राज्यात थंडी कायम राहिली. नोव्हेंबरच्या सुरूवातीला राज्यात पाऊस होता. दिवाळीतही पाऊस कोसळताना दिसला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुन्हा एकदा थंडी वाढण्याचे संकेत आहेत. कडाक्याची थंडी राज्यात पडेल. पंजाबच्या हिस्सारमध्ये सर्वात कमी तापमानाची देशात नोंद झाली. तिथे 2.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

परभणी 6.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड 7.3 अंश सेल्सिअस, धुळे 7.3 अंश सेल्सिअस, अहिल्यानगर 7.7 अंश सेल्सिअस, भंडारा, नाशिक, नागपूर, जेऊर आणि यवतमाळ येथे 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये सातत्याने पारा खाली जाताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी कडाक्याच्या थंडीचा इशारा दिला आहे.

डिसेंबर महिना संपत आला असतानाही देशातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामध्येच 31 डिसेंबर 2025 साठी भारतीय हवामान विभागाने मोठा पावसाचा इशारा 5 राज्यांना दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 31 डिसेंबरच्या संध्याकाळपासून उत्तर भारतातील पाच राज्यांमध्ये हवामानाची स्थिती वाईट होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा आणि काश्मीर या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला.

पुढील तीन दिवसांत तामिळनाडूच्या अनेक भागांमध्ये मध्यम पाऊस अपेक्षित आहे. नागपट्टणम, तंजावर, मायिलादुथुराई आणि पुदुकोट्टई या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळमध्येही पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात सातत्याने पाऊस पडताना दिसत आहे. देशात प्रत्येक भागात वेगवेगळे वातावरण आहे. पुढील काही दिवसांमध्ये उत्तरेकडे गारठा वाढण्याचे मोठे संकेत आहेत. उत्तरेकडे गारठा वाढला की, राज्यात येणाऱ्या शीत लहरी वाढतात आणि कडाक्याची थंडी पडते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.