आखातातील दोन ताकदवान मुस्लीम देश सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरात अचानक समोरासमोर आले आहेत. सौदी अरबने अचानक एका प्रकरणात संयुक्त अरब अमिरात ( युएई ) ला २४ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. जर मागणी मान्य झाली नाही तर दोन्ही देशात युद्ध होऊ शकते. अरबमधील या दोन ताकदवान देशात अचानक युद्धाची वेळ का आली ? अखेर कोणत्या प्रकरणात हे मुस्लीम देश एकमेकांचे शत्रू झाले हे पाहूयात…
सोदी अरबने यमन देशाच्या बंदराचे शहर मुकल्लावर भीषण बॉम्बहल्ला केला आहे. सौदीचा आरोप आहे की संयुक्त अरब अमिरात ( युएई ) यमनच्या कट्टरपंथीयांना शस्रास्रे पुरवत आहे. सौदी अरबने गेल्या तीन दिवसात यमनच्या अतिरेक्यांवर दोन मोठे हवाई हल्ले केले आहेत.
आता सौदी अरबने या बाबतीत संयुक्त अरब अमिरातीला ( युएई ) धमकी दिली आहे. सौदीने म्हटले आहे की यमनमधून त्यांचे भाड्याचे सैनिक पुन्हा माघारी बोलावण्यास तुमच्याकडे २४ तासांचा वेळ आहे. सौदी अरबने पूर्व यमनमध्ये खतरनाक कारवायासाठी संयुक्त अरब अमिरातीवर आरोप लावला आहे. त्याचे म्हणणे आहे की संयुक्त अरब अमिरात सौदी अरबच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहे. आणि इशारा दिला आहे की कोणत्याही प्रकारच्या उल्लंघनाचा जोरदार उत्तर दिले जाईल.
सौदीने अरबने संयुक्त अरब अमिरातला २४ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. सौदीने म्हटले आहे की २४ तासांत युएईने यमनमधून त्यांचे सर्व सैनिक माघारी बोलवावे. याच सोबत यमनच्या गटांना सैन्य आणि वित्तीय सहायत्ता बंद करण्याचे आवाहन केले आहे. काही आठवड्यांपूर्वी संयुक्त अरब अमिराती समर्थित भाड्याच्या सैनिकांनी सौदी अरब समर्थित भाड्याच्या सैनिकांविरोधात हल्ला सुरु केला होता. यामुळे दोन्ही देशात तणाव वाढला आहे.
सौदी अरबने मंगळवारी यमनच्या बंदरच्या शहरात मुकल्लावर बॉम्ब हल्ला केला आहे. सौदीचा आरोप होता की युएई यमनच्या फुटीरतावाद्यांना शस्रास्रे पुरवत आहेत. सौदीने थेट युएईला फुटीरतावाद्यांच्या प्रगतीला जबाबदार ठरवत अबूधाबीला कठोर इशारा देत सांगितले की त्याची कामे अत्यतिक खतरनाक आहे. या हल्ल्यामुळे अमिराती समर्थित ( साउदर्न ट्रांझिशनल काऊन्सिल ) दक्षिणी संक्रमणकालीन परिषदेच्या राज्य आणि फुटीरतावादी शक्तींमधील तणावात एक नवीन वाढ झाली आहे. हे प्रकरण रियाद आणि अबूधाबी दरम्यान संघर्षाचे कारण ठरले आहे.
येथे पाहा पोस्ट –
BREAKING:
Saudi Arabia accuses the UAE of dangerous actions in eastern Yemen.
They say UAE is threatening Saudi national security, and warns it will respond to any red-line… pic.twitter.com/sgRlQ01zxQ
— Megatron (@Megatron_ron) December 30, 2025
दोन्ही देश मध्य पूर्वेतील अनेक मुद्यांवर एकत्र जोडले होते. परंतू अलिकडच्या वर्षात आर्थिक मुद्दे आणि क्षेत्रीय राजनितीवर एकमेकांशी स्पर्धाही करत आहेत. यमनच्या हुती-विरोधी दलानी मंगळवारी आणीबाणीची घोषणा केली. युएईसोबतची सहकार्य समाप्त केले आणि आपल्या क्षेत्रातील सर्व दलांना २४ तासांच्या आत निघून जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी त्यांच्या नियंत्रित क्षेत्रातील सर्व सीमा ओलांडण्यावर ७२ तासांची बंदी घातली, तसेच विमानतळ आणि बंदरांवर प्रवेश करण्यास बंदी घातली.
मुकल्ला बेटावर हवाई हल्ला केल्यानंतर सौदी अरब प्रेस एजन्सीद्वारे जारी झालेल्या सैन्य निवेदनात म्हटले आहे की जहाजे युएईच्या पूर्व किनाऱ्यावर फुजैराह बंदरातून तेथे पोहचले होते. क्रु सदस्यांनी जहाजावरील ट्रॅकींग डिव्हाईस निष्क्रीय केले होते. आणि दक्षिणी संक्रमण परिषदेच्या दलांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने शस्रास्रे आणि युद्धक वाहने उतरवली होती. या शस्रास्रामुळे तात्काळ धोका निर्माण झाल्याने शांतता आणि स्थिरतेला धोका निर्माण झाल्याने आघाडीच्या वायुसेनेने आज सकाळी जहाजांवर मर्यादित हवाई हल्ला केला. सौदी अरब शिवाय अन्य सैन्याने यात सहभाग घेतला नाही. सौदी अरबने हा हल्ला जाणीवपूर्वक रात्रीचा केला ,कारण कोणताही सहाय्यक हानी होऊ नये याची काळजी घेण्यात आली.