म्हापण : ‘घ्या ओ...रासायनिक खतांची नाय, पाणी आणि शेण देऊन पिकवलेली अस्सल ताजी गावठी भाजी हा,’ असे बोल वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामीण भागातील म्हापण बाजारपेठेत ऐकायला मिळत आहेत.
विविध गावठी उत्पादनांसाठी या बाजारपेठ्याने आपली ओळख आजही कायम ठेवली आहे. स्वतः पिकवलेल्या ताज्या भाज्या, नारळ, कुळीथ, चिंच, आवळा, तिरफळा, उकडे तांदूळ, केळी, चवळी यांच्या विक्रीतून महिलांनी निर्माण केलेला हक्काच्या स्वयंरोजगारामुळे त्यांच्याही गाठीशी चार पैसे जमा होऊ लागले आहेत.
Ichalkaranji Market : लसणाची फोडणी महागली! नवीन आवक रखडल्याने दर दुपटीने वाढले, गृहिणींचा बजेट बिघडला‘कष्टाविना फळ नाही’ या उक्तीशी समरूप होऊन ग्रामीण भागातील महिलांनी म्हापण बाजारपेठेची आपली नाळ जोडून ठेवली आहे. स्वावलंबी आणि स्वाभिमानी जीवन जगणाऱ्या या महिलांचे तरुण मुलींसाठी आदर्शवत आणि प्रेरणादायी जीवन ठरले आहे.
खवणे, निवती, मळई, आंदुर्ले, कोचरा, मुनगी, पाट गांधीनगर यासह आजूबाजूच्या परिसरातील महिला स्वतः पिकवलेल्या मोहरी, मेथी, मुळा, लाल माठ, चवळीच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा यासारख्या ताज्या भाज्या ग्राहकांना उपलब्ध करून देतात.
Onion Price Crash Sparks : कांद्याचे दर कोसळले; शेतकऱ्यांनी लावणीकडे पाठ फिरवल्याने रोपे अक्षरशः कोमेजलीयाबरोबरच इतर शेतकऱ्यांकडे असलेला माल घेऊन त्यांचीही विक्री करत असल्यामुळे ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या म्हणीप्रमाणे त्यांनाही योग्य मोबदला मिळवून देण्याचे काम करत आहेत. सकाळी साडेसात वाजता एसटीने बाजारपेठेत दाखल होत आपल्या ठरलेल्या जागेवर बसून दुपारी साडेबारा ते एक वाजेपर्यंत या महिला आपला व्यवसाय करताना दिसून येतात.
व्यवसायात एकमेकांना साथ देत आपापल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहेत. रोज मिळणाऱ्या गावठी उत्पादनासाठी स्थानिकांसह चाकरमानी ग्राहकही या महिलांनी आपल्या व्यवसायाशी जोडून ठेवले आहे.
रोज पहाटे उठून घरातील कामे आटोपून मुलांच्या शाळा डब्याची व्यवस्था करून घरातून लवकर बाहेर पडतो. आमच्याकडे असलेला शेतमाल शिवाय इतर शेतकऱ्यांनी आपल्या वस्तूही विक्रीसाठी दिल्या तर त्या घेऊन म्हापण बाजारात विक्रीसाठी ठेवतो.
दुपारपर्यंत त्याची विक्रीही होते. यामुळे हक्काचे चार पैसे मिळतात. सायंकाळच्या वेळेत घराकडे शेतीची कामे करण्यासही वेळ मिळतो. मागणी केलेल्या ग्राहकांना अस्सल गावठी उत्पादन द्यायचे हा आजपर्यंतचा प्रवास आहे.
- कोमल पाटकर, शेतमाल व्यावसायिक पावसाळ्यात रानभाज्या,
उन्हाळ्यात वांयगणी शेतीबरोबरच परसबागेत लहान मिरच्या, चवळीच्या शेंगा, पालेभाज्या याशिवाय सुरण, काटेकणगी या शेतमालाची स्थानिक ठिकाणीच विक्री होत असल्यामुळे ही बाजारपेठ आमच्यासाठी आर्थिक उलाढालीचे साधन बनली. दोन ते तीन तास बाजारात बसल्यानंतर विक्री होत असलेल्या स्थानिक मालामुळे आमच्या कुटुंबात एक प्रकारे आर्थिक साहाय्य उपलब्ध होते.
- नम्रता जळवी, भाजीपाला व्यावसायिक
भाज्यांचे असे आहेत दर...मुळा/ लाल भाजी = ५० ला तीन जुडी
काटेकणगी = १०० रुपये किलो
गावठी नारळ = ४० ते ५० रुपये
गावठी पपई = ४० ते ५० रुपये
शेवग्याच्या शेंगा = २० रुपये जुडी