Mumbai Municipal Corporation Election : राज्यात महानगरपालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर रोजी संपलेली आहे. अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने अनेक ठिकाणी बंडखोरी, वाद, भांडण पाहायला मिळाले. काही ठिकाणी तर तिकीट न मिळाल्याने निष्ठावंतांनी आक्रोशही केला. दरम्यान, आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच प्रक्रिया संपलेली असल्यामुळे प्रचाराला रंग चढणार आहे. मुंबई महापालिकेत यावेळी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवत आहेत. या मनसे-ठाकरे गटाच्या युतीमुळे मात्र उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील अनेक पदाधिकारी नाराज झाले आहेत. मनसेसोबतच्या युतीला न जुमानता उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही स्थानिक नेत्यांनी बंडकोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मनसेमध्येही काही नेत्यांनी अशाच प्रकारे पक्षादेश झुगारून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
९५ चंद्रशेखर वायंगणकर, ठाकरे (अधिकृत उमेदवार हरी शास्त्री – ठाकरे)
१०६ सागर देवरे, ठाकरे (अधिकृत उमेदवार सत्यवान दळवी – मनसे)
११४ अनिशा माजगावकर, मनसे (अधिकृत उमेदवार राजोल पाटील – ठाकरे)
१६९ कमलाकर नाईक, ठाकरे (अधिकृत उमेदवार प्रवीणा मोरजकार – ठाकरे)
१९३ सूर्यकांत कोळी, ठाकरे (अधिकृत उमेदवार हेमांगी वरळीकर – ठाकरे)
१९६ संगीता जगताप, ठाकरे (अधिकृत उमेदवार पद्मजा चेंबूरकर – ठाकरे)
२०२ विजय इंदुलकर, ठाकरे (अधिकृत उमेदवार श्रद्धा जाधव – ठाकरे)
२०३ दिव्या बडवे, ठाकरे (अधिकृत उमेदवार भारती पेडणेकर – ठाकरे)
दरम्यान, मुंबई तसेच राज्यात इतर महापालिकांसाठी मनसे आणि ठाकरे गटाने युती केलेली असली तरी मुंबईत झालेल्या बंडखोरीमुळे या युतीपुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. श्रद्धा जाधव या मुंबईच्या माजी महापौर होत्या. त्या 202 वॉर्डातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. परंतु याच वॉर्डामधून ठाकरे गटाचे विजय इंदुलकर यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत. अशा महत्त्वाच्या जागांवर ठाकरे-मनसेच्या युतीत बंडखोरी होत असेल तर निवडणूक जिंकण्याचे या युतीपुढे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.