सुनिधी चौहानच्या कॉन्सर्टला पोहोचली झी मराठीची कमळी; स्वतःच्या नावाच्या गाण्यावर लगावले ठुमके; व्हिडिओ व्हायरल
esakal December 31, 2025 10:45 AM

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'कमळी' प्रेक्षकांची आवडती आहे. कमळीने प्रेक्षकांना वेड लावलंय. आता झी मराठीची 'कमळी' टीआरपीमध्ये थेट तिसऱ्या स्थानावर आली आहे. या मालिकेच्या कथेने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलंय. यात मालिकेत निरनिराळे ट्विस्ट आणि टर्न येत आहेत. मात्र मालिकेत साधी सरळ दोन वेण्या घातलेली ही कमळी आता मात्र वेगळ्याच अंदाजात प्रेक्षकांच्या समोर आलीये. मालिकेत कमळी हे पात्र अभिनेत्री विजया बाबर साकारतेय. आणि विजयाचा एक व्हिडिओ चाहत्यांमध्ये व्हायरल होतोय ज्यात ती सुनिधी चौहानच्या कॉन्सर्टमध्ये पोहोचलीये.

अभिनेत्री विजया बाबर मालिकेत अगदी गावाकडची मुलगी दिसत असली तरी खऱ्या आयुष्यात मात्र ती अगदी बोल्ड आहे. तिचे अनेक हॉट फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतीच विजया लोकप्रिय गायिका सुनिधी चौहान हिच्या कॉन्सर्टला गेली होती. या कॉन्सर्टदरम्यान ती एका गाण्यावर नाचली. हे गाणं तिच्याच मालिकेतील नावावर आहे. हे गाणं आहे 'धूम ३' चित्रपटातील 'कमली कमली'. यागाण्यावर चित्रपटात कतरीनाने उत्तम डान्स केला होता. तर आता विजयाने या गाण्यावर धमाकेदार ठुमके लगावलेत. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

View this post on Instagram

A post shared by Vijaya Babar (@vijaya_babar)