कागल : फाळणी नकाशाची नक्कल देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी कागल तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. शिवराम कृष्णा कोरवी (वय ५३, रा. हुपरी) असे त्याचे नाव आहे. तो या कार्यालयात दफ्तरबंद या पदावर आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच या कार्यालयावर लाचखोरीचा डाग पडला.
Sadanand Date : ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्तीLatest Marathi Live Updates 1 January 2026 : ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची बुधवारी राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. गृहविभागाने त्यासंदर्भात आदेश जारी केला असून, दाते यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. तसेच महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी नाकारण्यात आल्याने सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांचा आक्रोश दुसऱ्या दिवशी देखील कायम होता. सत्ताधारी महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीमध्ये देखील ‘डॅमेज कंट्रोल’साठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सांगलीत ४४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. पुण्यातील भीमा कोरेगाव येथे आज शौर्य दिन साजरा होत आहे. त्याचबरोबर आज जगभरात नवीन वर्षाचे स्वागत केले जात आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..