पुणे: राज्यातील लोकप्रिय योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या (ladki bahin yojana) लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे. पात्र लाडक्या बहिणींच्या बॅंक खात्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता पाठवण्यात आला आहे. काल (बुधवारी, ता ३१) सायंकाळी राज्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता जमा झाला आहे. लाडकी बहीण योजनेच्या (ladki bahin yojana) लाभार्थ्यांचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता बाकी होता. दोन्ही महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील, असं सांगितलं जात होतं. तर जानेवारी महिन्याचा देखील हफ्ता एकत्र मिळेल अशी अपेक्षा होती, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे ४ हजार ५०० रुपये जमा होतील, असा अंदाज बांधला होता, मात्र पात्र महिलांच्या बॅंक खात्यात १५०० रूपयांचा एक हफ्ता जमा झाला आहे. (ladki bahin yojana)
वर्षाच्या सरतेशेवटी सरकराने लाडक्या बहिणींना केवळ दीड हजार रुपयांवर खुश केलं आहे. एकीकडे डिसेंबर महिना भरुन पडलेला असताना केवळ नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिल्याने बहिणींचा काहीसा अपेक्षाभंग झाल्याचं चित्र आहे. पण नोव्हेंबरचा हफ्ता खात्यात आल्याने महिला तशा खुश आहेत. दरम्यान, लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची शेवटची तारीख काल (३१ डिसेंबर) होती. ज्या महिलांनी मुदतीपूर्वी केवायसी केली नाही त्यांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होईल. त्यासाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (ladki bahin yojana)
अनेकदा तांत्रिक कारणांमुळे किंवा बँकेच्या सर्व्हरमुळे मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा एसएमएस येण्यास उशीर होतो, किंवा कधी कधी मेसेज देखील येत नाही. अशा वेळी खालील पद्धतींनी तुमचे पैसे जमा झालेत की नाही ते तपासू शकता.
– बँक पासबुक अपडेट करा, जवळच्या बँकेत जाऊन किंवा ‘पासबुक प्रिंट’ करून तुमचे बॅलेन्स तपासा.
– मोबाईल बँकिंग / UPI – जर तुम्ही फोन पे, गुगल पे किंवा बँकेचे ॲप वापरत असाल, तर तिथे ‘बँक बॅलेन्स’ चेक करा.
– बँकेकडून एसएमएस न आल्यास तुम्ही बँकेच्या बॅलन्स चेक क्रमांकावर एसएमएस पाठवून किंवा टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल करुन तुमच्या बँक खात्यातील रकमेच्या संदर्भात जाणून घेऊ शकता.
– डेबिट कार्ड असल्यास एटीएममध्ये जाऊन लास्ट ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पाहू शकता.
– ऑनलाईन बॅंकिंग वापरत असाल तर त्या बँकेंच्या अँपमध्ये मिनी ट्रान्झॅक्शमध्ये पाहू शकता.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ईकेवायसी करणं सर्व महिलांसाठी अनिवार्य आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख 31 डिसेंबर शेवटची तारीख आहे. जर ईकेवायसी केलं नसेल तर नवीन वर्षापासून म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून या महिलांच्या खात्यात 1500 रुपये येणे कायमचे बंद होऊ शकते. नियमानुसार, ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही किंवा ज्यांचे ई-केवायसी अपूर्ण आहे, त्यांना ‘अपात्र’ ठरवले जाऊ शकते. अशा महिलांना नवीन वर्ष 2026 मध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून दूर राहावं लागणार आहे.
आणखी वाचा