देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन आतून कशी दिसते?
esakal January 02, 2026 02:45 AM
वंदे भारत स्लीपर ट्रेन

देशातल्या पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची गुरुवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली.

नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ट्रेनचं उद्घाटन होणार असल्याचंही वैष्णव यांनी सांगितलं.

हिरवा झेंडा

१७ किंवा १८ जानेवारी रोजी मोदी पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.

हायस्पीड ट्रायल

स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करुन बनवलेल्या या वंदे भारत ट्रेनचं हायस्पीड ट्रायल यशस्वी झालं आहे.

कोटा-नागदा सेक्शन

हे ट्रायल कोटा-नागदा सेक्शनदरम्यान झालं. या मार्गावर ट्रेनने १८० किलोमीटर प्रतितास वेग धारण केला होता.

१६ डबे

रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीखाली हे ट्रायल घेण्यात आलेलं होतं. ही ट्रेन १६ डब्यांची आहे.

४ सेकंड एसी

ट्रेनमध्ये ११ थर्ड एसी, ४ सेकंड एसी आणि एक फर्स्ट एसी कोच असणार आहे.

८२३ प्रवासी

ट्रेनमध्ये साधारण ८२३ प्रवासी प्रवास करु शकतात. ही एक सेमी हायस्पीड ट्रेन असेल.

डिझाईन

१८९ किलोमीटर प्रतिसात धावण्याची या ट्रेनची क्षमता आहे. आरामदायी प्रवासासाठी ट्रेनचं डिझाईन करण्यात आलेलं आहे.

वाघ पाण्यात कसा पोहतो? किती लांबपर्यंत जाऊ शकतो? येथे क्लिक करा
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.