सोशल मीडियावर आसपास घडणाऱ्या बारीकसारीक गोष्टीही व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओने क्रीडाप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं आहे. क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा यांनाही या व्हिडीओचं विश्लेषण करण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी आपल्या शैलीत या व्हिडीओचं विश्लेषण केलं आहे. एका ठिकाणी प्लास्टिक बॉलने क्रिकेट सामने खेळले जात असल्याचं दिसत आहे. यात एक गोलंदाज प्लास्टिक बॉल ज्या पद्धतीने स्विंग करत आहे ते पाहून आश्चर्याचा धक्का बसणं सहाजिकच आहे. या स्विंगला क्रिकेट जगतात बनाना स्विंग असं संबोधलं जातं. हा चेंडू हवेत इतका वळतो की शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाजाला त्या चेंडूचा अचूक अंदाज घेणं कठीण होतं आणि क्लिन बोल्ड होतो. या गोलंदाजीवर आकाश चोप्राने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आकाश चोप्राने सोशल मिडिया हँडलवर व्हिडीओ शेअर करत त्याचं कौतुक केलं. त्याच्या मजेदार शैलीत क्रिकेटचं विश्लेषण करत सांगितलं की, त्याची गोलंदाजीचा स्विंग पाहून जगातील घातक गोलंदाज मिचेल स्टार्कही लाजेल. आकाश चोप्राच्या मते प्लास्टिक चेंडूने अशा पद्धतीने स्विंग करणं खरंच आश्चर्यकारक आहे. खरं तर अशा पद्धतीचा स्विंग बॉल खेळणं कोणत्याही गोलंदाजासाठी अशक्य आहे, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. पण लेदर बॉलने इतका स्विंग करणं प्लास्टिक बॉलच्या तुलनेनं कठीण आहे. कारण प्लास्टिक आणि लेदर बॉलमध्ये फरक आहे. दोन्ही चेंडूंच्या वजनात फरक आहे.
Swing aisi ke Mitchell Starc bhi sharma jaye
#Aakashvani #cricket pic.twitter.com/prrr4H7PGr
— Aakash Chopra (@cricketaakash) January 1, 2026
आकाश चोप्राने शेअर केलेल्या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांच्या मते प्लास्टिक चेंडूने अशा पद्धतीने स्विंग करणं शक्य आहे. कारण प्लास्टिक चेंडू हलका असतो आणि वाऱ्याच्या दबामुळे सहज दिशा बदलू शकतो. पण व्हिडीओतील गोलंदाजाचं स्विंग चेंडूवर चांगलं नियंत्रण असल्याचं दिसत आहे. कारण कसा होऊ शकतो याचा अंदाज गोलंदाजाला आहे. त्यामुळे गोलंदाज अचूक मारा करत आहे असं म्हंटलं तर चुकीचं ठरणार नाही. या व्हिडीओतून स्थानिक क्रिकेटमध्येही टॅलेंट असल्याचं दिसून आलं आहे. व्हिडीओच्या माध्यमातून हे टॅलेंट जगासमोर येत आहे.