Mumbai News: नववर्षाची सुरुवात देवदर्शनानं, मुंबईतील 'सिद्धिविनायक'सह अनेक मंदिरांत भाविकांसाठी विशेष सोय
esakal January 02, 2026 03:45 AM

मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरासह सर्वच प्रमुख मंदिरे पूर्णपणे सज्ज झाली आहेत. भाविकांच्या प्रचंड गर्दीला सामोरे जाण्यासाठी सिद्धिविनायक मंदिर पहाटे ३.१५ वाजल्यापासून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येणार आहे. तसेच, रेल्वे स्थानकावरून मंदिरात येण्यासाठी मोफत बससेवा आणि सुरक्षेसाठी कडक व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून भाविकांना सुलभ दर्शन मिळेल.

मुंबईसह उपनगरांतील अनेक नागरिक नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील प्रमुख मंदिरांमध्ये देवदर्शनासाठी जात असतात. सिद्धिविनायक, महालक्ष्मी आणि मुंबादेवी मंदिराच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला आणि पहिल्या दिवशी मंदिरांमध्ये होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता सर्वच मंदिर प्रशासनाने व्यवस्थित नियोजन केले आहे.

Mumbai Rain: मुंबईत २०२६ ची सुरुवात आश्चर्याने! थंडीच्या काळात पावसाची एंट्री

मुंबईतील प्रत्येक मंदिरांमध्ये भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. ही गर्दी लक्षात घेता व्यवस्थापन करण्यात आले आहे. महालक्ष्मी मंदिरातही दिवभर लाखो भाविक दर्शनासाठी येतील, असे मंदिर प्रशासनाने सांगितले. सिद्धिविनायकमंदिराकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार (ता. १) तसेच मंगळवारी (ता. ६) अंगारक संकष्ट चतुर्थीला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता व्यवस्थापन करण्यात आले आहे. महालक्ष्मी मंदिरातही दिवभर लाखो भाविक दर्शनासाठी येतील, असे मंदिर प्रशासनाने सांगितले.

विशेष तयारी
  • दर्शनाची वेळ : सिद्धिविनायक मंदिरात १ जानेवारीला पहाटे ३.१५ वाजता दर्शन सुरू होईल आणि रात्री उशिरापर्यंत सुरू राहील. दादर स्थानकावरून मंदिरात येण्यासाठी मोफत बससेवा

  • विशेष सोयीसुविधा : ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिला आणि लहान बाळांसोबत आलेल्या पालकांसाठी स्वतंत्र रांगा असतील. मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू आत नेण्यास मनाई असून त्या बाहेर ठेवण्याची व्यवस्था केली आहे.

Dombivli Politics: ज्यांच्याशी वाद, त्यांच्याच सोबत रणनीती! डोंबिवलीत पॅनल २२ मधील ‘राजकीय गणित’ उघड
  • सुरक्षा व्यवस्था : मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू आत नेण्यास मनाई असून त्या बाहेर ठेवण्याची व्यवस्था केली आहे.

  • प्रवासासाठी सोय : दादर रेल्वे स्थानकावरून मंदिरात येण्यासाठी मोफत बससेवा आणि मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन

  • डिजिटल दर्शन : रांगेत असलेल्या भाविकांसाठी एलईडी स्क्रीनवर दर्शनाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.