नुकताच चीनकडून अत्यंत मोठा दावा करण्यात आला. चीनच्या अंतराळ स्थानकात गेलेली एक मादी उंदीर पृथ्वीवर परतली आहे. विशेष म्हणजे तिने अंतराळात तब्बल नऊ पिल्ल्यांना जन्म दिला. ही घटना अंतराळात मानवी वस्ती स्थापन करण्याच्या मानवतेच्या स्वप्नाकडे एक अत्यंत महत्वाचे पाऊस नक्कीच म्हणावे लागेल. थोडक्यात काय तर अंतराळात प्रजनन शक्तीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही आणि बाळही चांगले निरोही जगू शकते, यावरून स्पष्ट होत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, अंतराळ प्रवासाचा सस्तन प्राण्यांच्या प्रजनन क्षमतेवर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नाही. हा प्रयोग चीनच्या शेनझोऊ-21 मोहिमेचा एक भाग होता. 31 ऑक्टोबर रोजी चीनने शेनझोऊ-21 अंतराळयानातून चार उंदीर आपल्या अंतराळ स्थानकावर पाठवले आणि हा प्रयोग केला.
या प्रयोगातील सर्वात खास बाब म्हणजे हे उंदीर पृथ्वीपासून सुमारे 400 किलोमीटर उंचीवर असलेल्या अंतराळ स्थानकावर तब्बल दोन आठवडे राहिले. 14 नोव्हेंबरला ते पृथ्वीवर पुन्हा सुरक्षित परत आले. त्यानंतर 10 डिसेंबर रोजी एका मादी उंदराने नऊ निरोगी पिल्लांना जन्म दिला, ही सर्वात विशेष बाब आहे. मादी उंदराने दिलेल्या 9 पिल्ल्यांपैकी सहा पिल्ले जगली. जो तसा बघायला गेला तर सामान्य दर नक्कीच आहे. सर्वकाही व्यवस्थित असून उंदाराचे पिल्ले व्यवस्थित वाढत आहेत.
चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या संशोधक वांग हाँगमेई यांनी याबद्दल बोलताना म्हटले की, यानंतर आता हे स्पष्ट होते की, कमी कालावधीत अंतराळ प्रवासाचा उंदरांच्या प्रजनन क्षमतेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. मादी उंदर ज्यावेळी अंतराळात होती, त्यावेळी ती गर्भवती होती आणि ती पृथ्वीवर आली, त्यावेळी तिने पिल्लांना जन्म दिला. नक्कीच हा प्रयोग इतका जास्त सोप्पा नव्हता.
शेनझोऊ-20 चे पृथ्वीवर परत येण्यास विलंब झाल्यामुळे उंदरांनी अंतराळात घालवलेला वेळ वाढला आणि संभाव्य अन्नतुटवड्याबद्दल चिंता वाढली होती. अंतराळातील उंदरांच्या अधिवासात पृथ्वीवरील दिवस आणि रात्रीच्या चक्राप्रमाणेच चक्र राखण्यासाठी सकाळी सात वाजता लाईट लावले जात आणि संध्याकाळी सात वाजता बंद केले जात, असल्याचीही त्यांनी माहित दिली.
उंदीर जनुकीयदृष्ट्या मानवांशी खूप साम्य साधतात. वेगाने प्रजनन करतात आणि तणावाला मानवांप्रमाणेच प्रतिक्रिया देतात. या प्रयोगावरून हे स्पष्ट होते की, अंतराळात प्रजननाला कोणतीही समस्या नाही. ते उंदीरावर करण्यात आलेल्या प्रयोगावरून सिद्ध होते. या प्रयोगासाठी अनेक दिवसांपासून मेहनत घेतली जात होती. शेवटी मादी उंदीराने पिल्लांना जन्म दिला.