India-Balochistan : चीनच्या इराद्याबद्दल बलूच नेत्याचा धक्कादायक खुलासा, भारताला पत्राद्वारे आधीच केलं सर्तक
GH News January 02, 2026 08:11 PM

बलूचिस्तानच्या एका नेत्याने भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रात बलूच नेत्याने चीन पुढच्या काही महिन्यात बलूचिस्तानात आपलं सैन्य तैनात करु शकतो असा इशारा दिला आहे. त्यामुळे केवळ बलूचिस्तानालाच धोका नाही, तर या क्षेत्रात भारतासमोरही एक आव्हान उभं राहिलं. मीर यार बलूच यांनी जयशंकर यांना उद्देशून 1 जानेवारी 2026 रोजी हे पत्र लिहिलं आहे. यात स्वत:ला त्यांनी बलूचिस्तानचं प्रतिनिधी म्हटलं आहे. बलूचिस्तानच संरक्षण आणि स्वतंत्र सैन्याकडे सतत दुर्लक्ष केलं तर चीन तिथे आपलं सैन्य तैनात करु शकतो. त्यांचं असं कुठलही पाऊल भारत आणि बलूचिस्तान दोघांच्या भविष्यासाठी धोकादायक ठरेल असं मीर यार बलूच यांनी पत्रात म्हटलं आहे.

बलूचिस्तानच रक्षण आणि स्वतंत्र सैन्य क्षमतेला बळकट केलं नाही, तर जुन्या पद्धतीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर चीन पुढच्या काही महिन्यात बलूचिस्तानात आपल्या सैन्य तुकड्या तैनात करेल असं पत्रात लिहिलं आहे. सहा कोटी बलूच लोकांच्या इच्छेशिवाय बलूचिस्तानच्या भूमीवर चिनी सैनिकांची तैनाती ही भारत आणि बलूचिस्तान दोघांच्या भविष्यासाठी अकल्पनीय धोका आणि आव्हान असेल.

परिस्थिती अधिक धोकादायक बनली

चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. पाकिस्तान आणि चीनची रणनितीक मैत्री म्हणजे CPEC आता शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे. भारताकडून त्यांनी मदत मागितली आहे. दोघांना जे धोके आहेत, ते वास्तविक आणि तात्काळ आहेत असं मीर यार बलूच यांनी सांगितलं. मीर यार बलूच यांनी भारत आणि बलूचिस्तानमधील जुन्या ऐतिहासिक आणि सांस्कृतीक संबंधांचा उल्लेख केला. हिंगलाज माता मंदिर सारख्या पवित्र स्थळांचा हवाला दिला.

मजबूत सहकार्याची अपेक्षा

मोदी सरकारने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या कारवाईचं सुद्धा पत्रातून कौतुक करण्यात आलय. या मोहिमेद्वारे पाकिस्तान प्रायोजित दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर क्षेत्रीय सुरक्षा आणि न्यायाप्रती साहस आणि दृढ कटिबद्धतेचं उदहारण आहे. मीर यार बलोच यांनी दोन देशांमध्ये अधिक मजबूत सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.