हिमाचल प्रदेश (प्रथम क्रमांक) : ताज्या 'इंडियन हॅपीनेस इंडेक्स 2025' नुसार हिमाचल प्रदेशने अव्वल स्थान पटकावले आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य, प्रदूषणमुक्त हवा आणि शांत जीवनशैलीमुळे लोक अधिक समाधानी आहेत.
मिझोराम (लहान राज्यांमध्ये अव्वल) : मिझोराम हे सातत्याने आनंदी राज्यांच्या यादीत अग्रस्थानी असते. येथे 100% साक्षरतेच्या जवळ असलेला दर आणि समाजात असलेली समता हे आनंदाचे मुख्य कारण आहे.
मजबूत सोशल बॉन्डिंग : मिझोराममध्ये 'लुख्मोल' सारखी सामाजिक संस्कृती आहे, जिथे लोक एकमेकांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात. कौटुंबिक आणि सामाजिक संबंध घट्ट असल्याने येथील लोक मानसिकदृष्ट्या अधिक आनंदी असतात.
कामाचा गौरव : मिझोरामसारख्या राज्यांमध्ये कोणत्याही कामाला लहान मानले जात नाही. येथील मुले वयाच्या 16-17 व्या वर्षापासूनच आर्थिक स्वावलंबनासाठी प्रयत्न करतात, ज्यामुळे त्यांच्यात न्यूनगंड राहत नाही.
इतर आनंदी राज्ये आणि शहरे : यादीत अंदमान आणि निकोबार बेटे तिसऱ्या, तर पंजाब चौथ्या आणि गुजरात पाचव्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे, 'टाईम आऊट 2025' च्या सर्वेक्षणात मुंबईला आशियातील सर्वात आनंदी शहर म्हणून स्थान मिळाले आहे.