बिग बॅश लीग स्पर्धेत हारिस रऊफने नाक कापलं, शेवटच्या षटकात सामना हातातून घालवला
GH News January 03, 2026 01:12 AM

ऑस्ट्रेलियात सुरु असलेली बिग बॅश लीग स्पर्धा आता प्रत्येक सामन्यानंतर रंगतदार वळणावर आली आहे. या स्पर्धेच्या 20व्या सामन्यात मेलबर्न स्टार्स आणि ब्रिस्बेन हिट हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पाकिस्तानच्या हारिस रऊफची धुलाई केली. ब्रिस्बेन हिटच्या फलंदाजांनी हारिस रऊफला गिऱ्हाईक केलं होतं. इतकंच शेवटच्या षटकात 10 धावांची गरज असताना त्याला वाचवता आल्या नाहीत. चार चेंडूतच त्याने दहा धावा देऊन टाकल्या. हारिस रऊफने या सामन्यात 10च्या वर इकोनॉमीने धावा दिल्या. हारिस रऊफने ब्रिस्बेन हिटविरूद्ध 3.4 षटकांचा स्पेल टाकला. या स्पेलमध्ये त्याने एकच विकेट घेतली आणि 40 धावा दिल्या. यावेळी त्याच्या गोलंदाजी धार पूर्णपणे बोथट झाल्याचं दिसून आलं.

मेलबर्न स्टार्सच्या कर्णधाराने शेवटच्या षटकात हारिस रऊफवर विश्वास टाकला. त्याने तीन षटकात आधीच 30 धावा दिल्या होत्या. तरीही त्याच्या विश्वास टाकला. पण कर्णधाराचा हिरमोड झाला. त्याने चार चेंडूतच 10 धावा देऊन टाकल्या. हारिस रऊफला धावांवर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि विकेटही घेता येत नाही. टी20 वर्ल्डकप 2026 पूर्वी हारिस रऊफचा फॉर्म पाहून पाकिस्तानचंही टेन्शन वाढलं आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी फक्त एका महिन्याचा अवधी शिल्लक असताना त्याच्या कामगिरीबाबत पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी चिंतेत आहेत. दुसरीकडे शाहीन आफ्रिदीही दुखापतग्रस्त आहे. वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत फिट होईल की नाही हे सांगणं कठीण आहे.

मेलबर्न स्टार्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 195 धावा केल्या. तसेच विजयासाठी 196 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान ब्रिस्बेन हिटने 19.4 षटकात 6 गडी गमवून पूर्ण केला. मेलबर्न स्टार्सकडून टॉम करनने 4 षटकात 1 गडी घेत 47 धावा, हारिस रऊफने 3.4 षटकात 1 गडी घेत 40 धावा, पीटर सिडलने 4 षटकात 2 गडी घेत 38 धावा, मिचेल स्वीप्सनने 3 षटकात 2 गडी घेत 30 धावा, ग्लेन मॅक्सवेलने 3 षटकात 20 धावा आणि मार्कस स्टोइनिसने 2 षटकात 18 धावा दिल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.