मनसेला पुन्हा धक्का; बड्या महिला नेत्याची अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एन्ट्री
Saam TV January 07, 2026 10:45 AM

बदलापुरात मनसेला मोठा धक्का

बदलापूर मनसे शहर महिला अध्यक्षा चेंदवणकर यांचा अजित पवार गटात प्रवेश

अजित पवार गटाचे नेते दामले यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला

मयुरेश कडव, साम टीव्ही

महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एकपाठोपाठ शिलेदार सोडून जाताना दिसत आहे. संतोष धुरी, हेमंत कांबळे यांच्यानंतर आता आणखी एका महिला नेत्याने मनसेची साथ सोडली आहे. बदलापूरच्या महिला शहर अध्यक्षांनी अजित पवार गटाचे नेते, मंत्री आशिष दामले यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

उपराष्ट्राध्यक्षांच्या घरावर हल्ला, खिडकींच्या काचा फुटल्या; संपूर्ण अमेरिकेत खळबळ

मनसेच्या बदलापूर महिला शहर अध्यक्ष संगीता चेंदवणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला आहे. मनसेच्या प्रमुख पदाधिकारी असलेल्या संगीता चेंदवणकर यांनी अनेक वर्षांपासून बदलापूरच्या शहराध्यक्ष पद भूषवले आहे. तसेच सध्या त्या महिला शहर अध्यक्षपदी होत्या.

महापुरुषांचा इतिहास बदलण्याचा भाजपचा प्रयत्न; काँग्रेसच्या सतेज पाटील यांचा जोरदार घणाघात

आक्रमक महिला कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या संगीता चेंदवणकर यांनी स्थानिक राजकारणात होत असलेल्या गळचेपीमुळे हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलंय. एकीकडे मुंबईत ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवत असताना बदलापुरात मात्र मनसेला मोठा धक्का बसलाय.

Maharashtra Politics : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; राज्याच्या राजकारणात खळबळ

पक्षप्रवेशानंतर संगीता चेंदवणकर म्हणाल्या, 'विधानसभा आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी माझी गळचेपी झाली. कोणत्याही कार्यकर्त्यावर अशी वेळ येऊ नये, अशी वेळ माझ्यावर आली होती. त्यावेळी माझी आई आजारी होती. त्यावेळी देखील मला बदलापूरकरांनी मते दिली आहेत. ती माझ्या हक्काची मते होती. राज ठाकरे यांनी मला नावारुपास आणलं. ती मते माझ्या हक्काची मते होती. सर्वांनी माझा संघर्ष पाहिला आहे. मी सभागृहात जाऊ नये, यासाठी प्रयत्न झाले. घरात बसणारी कार्यकर्ती नाही. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला'.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.