Nagpur experiences its coldest January : विदर्भात मंगळवारी थंडीच्या लाटेने अक्षरशः भीषण रूप धारण केले. नागपूरसह अनेक जिल्ह्यांच्या तापमानात ६ अंशांपर्यंत मोठी घट होऊन पारा चक्क ७ अंशांवर आला. थंडीच्या थर्ड डिग्री टॉर्चरने अख्खी उपराजधानी गारठली. नागपुरात नोंद झालेले ७.६ अंश सेल्सिअस तापमान यंदाच्या हिवाळ्यासह गेल्या पाच वर्षांतील जानेवारी महिन्यातील नीचांकी ठरले, तर विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया येथे करण्यात आली.
प्रादेशिक हवामान विभागाने यलो अलर्ट दिल्यामुळे बुधवारीही पारा खाली जाण्याची दाट शक्यता आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, विदर्भात मंगळवारी थंडीचा कहर दिसून आला. हवेतील प्रचंड गारठ्यामुळे विदर्भातील बहुतांश शहरांचा पारा खाली आला. थंडीचा सर्वाधिक फटका नागपूर, गोंदिया, वर्धा, अमरावती व ब्रह्मपुरी या चार शहरांना बसला. चोवीस तासांत नागपूरच्या तापमानात तब्बल ६ अंशांची घट होऊन पारा या मोसमात प्रथमच ८ च्या खाली म्हणजेच ७.६ अंशांवर आला. त्यामुळे मंगळवारची रात्र नागपूरकरांसाठी सर्वात थंडगार ठरली.
Vidarbha Cold Wave: हिवाळा रंगात, थंडी जोरात; नागपूरचा पारा ८.२ अंशांवर, गोंदिया @ ८यापूर्वी १० डिसेंबर रोजी नागपूरचा पारा ८.० अंशांपर्यंत घसरला होता. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या पाच वर्षांत जानेवारी महिन्यातील नागपूरचे हे सर्वात कमी तापमान राहिले. याआधी २०२१ मध्ये २९ तारखेला पारा ७.६ अंशांपर्यंतच घसरला होता. गोंदियाच्याही किमान तापमानात साडेतीन अंशांची घट होऊन पारा ७.० वर आला. येथे नोंद झालेले तापमान संपूर्ण विदर्भात नीचांकी ठरले. याशिवाय वर्धा येथे ८.४, अमरावती येथे ९.२ व ब्रह्मपुरी येथे ९.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
दिवसाही गार वारे हवेतील असह्य गारठ्यामुळे नागपूरकर हैराण असून, रात्रीसह दिवसाही शरीराला गार वारे झोंबत आहेत. सायंकाळ होताच हुडहुडी वाढत जाते. लाटेपासून बचाव करण्यासाठी वैदर्भीयांना उबदार कपड्यांसह शेकोट्यांचाही आधार घ्यावा लागत आहे. केवळ ग्रामीण भागांतच नव्हे, शहरातही लाटेचा परिणाम दिसून येत आहे.
Pune Weather : पुण्यात थंडीचा कडाका वाढला, येलो अलर्ट जारी; पुढील तीन दिवस कसे असेल हवामान?आजही विदर्भात यलो अलर्ट हवामान विभागाने मंगळवारीही विदर्भातील नागपूर, गोंदिया व अमरावती या तीन जिल्ह्यांमध्ये तीव्र थंडीचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे तापमानात आणखी घसरण अपेक्षित आहे. थंडीची लाट या आठवड्यात कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात बर्फवृष्टीचा जोर वाढल्यामुळे विदर्भासह आजूबाजूच्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे.