ती पुन्हा येतंय… राज्यातील काही भागात मोठा इशारा, अलर्ट जारी, भारतीय हवामान विभागाने…
Tv9 Marathi January 07, 2026 04:45 PM

वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. उत्तरेकडे कडाक्याचा गारठा वाढला असून थंडी वाढलीये. पुढील काही दिवस पारा अधिक खाली जाण्याचे संकेत आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, चंदीगड या भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. या राज्यांमध्ये पारा सतत घसरत आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडल्याने राज्यातही गारठा वाढला असून पुढील काही दिवसात थंडी अधिक तीव्र होईल. गोंदियात नीचांकी तापमानाची नोंद झाली असून 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 8 अंश सेल्सिअसची नोंद झाली. नागपूरमध्ये 7.8 तापमानाची नोंद झाली. वर्षाच्या पहिल्याच दिवशी आलेल्या अवकाळी पावसानंतर पारा वाढला होता. त्यानंतर आता पुन्हा राज्यात पारा खाली जाताना दिसत आहे.

किमान तापमान घटल्याने पुण्यात गारठा वाढला. गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमानामध्ये लक्षणीय वाढ झाल्याने शहरातील थंडी ओसरली होती. मंगळवारी एका दिवसात किमान तापमानामध्ये तीन अंश सेल्सिअसने गट नोंदवण्यात आली पुढील तीन दिवस हवामान स्थिर राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. गोदिंयात आज शीत लहरीचा इशारा देण्यात आला. पारा घसरून 7 अंशावर पोहोचला. यंदाचे सर्वांत कमी तापमान नोंदवले गेले. विदर्भात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

मुंबईसह अनेक शहरांमध्ये वाढलेलेप्रदूषण हा गंभीर विषय बनला. वाढलेल्या प्रदूषणामुळे नागिरकांच्या आरोग्याचे प्रश्न उपस्थित होत आहेत. वायू प्रदूषणात प्रचंड वाढ झाली असून हवा घातक आहे. मुंबईमधील वायू प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. प्रशासनाकडून वायू प्रदूषण रोखण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न केली जात आहेत, असे सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रदूषण वाढतच आहे.

हवामान विभागाने 8 आणि 9 जानेवारी रोजी तामिळनाडूमध्ये मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 9 आणि 10 जानेवारी रोजी तामिळनाडू, केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. देशातून मॉन्सून जाऊन काही दिवस झाले असली तरीही अजूनही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाहीये. सततच्या पावसामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या असंख्य समस्या निर्माण झाल्या आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.