चांदीच्या किमतीच्या बातम्या : मागील वर्षी म्हणजे 2025 मध्ये भारतातील चांदीच्या किंमतीत जवळजवळ तिप्पट वाढ झाली आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) च्या अहवालानुसार, औद्योगिक मागणीत वाढ, जागतिक भू-राजकीय तणाव आणि पुरवठ्याशी संबंधित अनिश्चितता यामुळे चांदीला धोरणात्मक धातू म्हणून आणखी महत्त्व आले आहे. भारत सध्या रिफाइंड चांदीचा जगातील सर्वात मोठा आयातदार आहे. 2025 मध्ये, देशाने सुमारे 9.2 अब्ज डॉलर किमतीची चांदी आयात केली आहे. किंमतीत लक्षणीय वाढ होऊनही, भारताची चांदीची आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत 44 टक्के जास्त राहिली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी 2025 मध्ये चांदीची किंमत सुमारे 80 हजार ते 85000 प्रति किलोग्रॅम होती, तर जानेवारी 2026 मध्ये ती सुमारे 2.43 लाख प्रति किलोग्रॅम झाली आहे. GTRI च्या मते, ही तीव्र वाढ केवळ भू-राजकीय तणाव किंवा व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्यासारख्या घटनांमुळे नाही तर जागतिक मागणीच्या रचनेत जलद बदल झाल्यामुळे देखील आहे. सध्या दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
आज, जगातील 50 टक्क्यांहून अधिक चांदी औद्योगिक क्षेत्रात वापरली जाते, प्रामुख्याने:
इलेक्ट्रॉनिक्स,
सौर ऊर्जा,
विद्युत वाहने (EVs),
संरक्षण आणि शस्त्रे प्रणाली,
आणि वैद्यकीय तंत्रज्ञान.
2000 पासून शुद्ध चांदीची जागतिक मागणी जवळजवळ आठ पटीने वाढली आहे. हे स्पष्टपणे दर्शवते की चांदी आता केवळ पारंपारिक मौल्यवान धातू राहिलेली नाही तर आधुनिक औद्योगिक अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाची इनपुट बनली आहे. पुरवठा या वाढत्या मागणीशी जुळवून घेत नाही. चीन या क्षेत्रात वर्चस्व गाजवत आहे. चीन हा जगातील सर्वात मोठा चांदी निर्यातदार असला तरी, भारत त्याचा सर्वात मोठा आयातदार राहिला आहे.
चीनने चांदी निर्यातीसाठी परवाना अनिवार्य केल्यावर भारताच्या चिंता आणखी वाढल्या आहेत. 1 जानेवारीपासून लागू झालेल्या या नवीन नियमानुसार प्रत्येक निर्यात शिपमेंटसाठी चीन सरकारची परवानगी आवश्यक आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की या निर्णयामुळे जागतिक चांदी पुरवठा साखळीवर दबाव वाढू शकतो, ज्यामुळे किमतीत आणखी चढ-उतार होऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा