सोन्याच्या दरात 1752 रुपयांची वाढ, चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, 4219 रुपयांनी दरात वाढ
Marathi January 09, 2026 08:25 PM

सोन्याचा दर नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात शुक्रवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. २४ कॅरेट सोन्याच्या दरात १७५२ रुपयांची वाढ झाली. तर, चांदीच्या दरात देखील ४२१९ रुपयांची तेजी दिसून आली. भांडवली बाजारात अस्थिरता वाढल्यास गुंतवणूकदारांकडून सुरक्षित पर्याय म्हणून सोने आणि चांदीतील गुंतवणुकीला प्राधान्य दिलं जातं.

२४ कॅरेट सोन्याच्या दरात १७५२ रुपयांची वाढ पाहायला मिळाली. यामुळं सोन्याचे एका तोळ्याचे दर १३७१९५ रुपयांवर पोहोचले आहेत. गुरुवारी सोन्याचा दर १३५४४३ रुपयांवर होता. चांदीच्या दरात देखील आज तेजी पाहायला मिळाली. एक किलो चांदीचा दर २३९९९४ रुपयांवर पोहोचला आहे. काल चांदीचा दर २३५७७५ रुपयांवर होते. २४ तासात चांदीचे दर ४२१९ रुपयांनी वाढ झाली आहे.

आयबीजेएच्या दरानुसार 23 कॅरेट सोन्याचे दर १३६६४६ रु. तोळा, 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर १२५६७१ रु. आहे. तर, १८ कॅरेट सोन्याचा दर १०२८९६ रु. तोळा आहे. 14 कॅरेट सोन्याचा दर 80259 रु. एक तोळा असा आहे.

चांदीच्या दरात पुन्हा एकदा तेजी प्रारंभ झाली आहे. ज्यामुळं चांदीचे दर पुन्हा एकदा उच्चांकाजवळ पोहोचले आहेत. जानेवारीला एक किलो चांदीचा दर 248000 रुपयांवर होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल चांदीचे 13000 रुपयांनी कमी झाले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

आयबीजेएच्या डेटा नुसार सोन्याच्या दरानं 29 डिसेंबरला उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा एका तोळ्याचा दर १३८१६१ रु. होता. त्यानंतर सोन्याचे दर घसरले आहेत. विशेष बाब म्हणजे लग्न सराई येत्या काही दिवसात प्रारंभ होईल. त्यामुळं सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ होईल, परिणामी सोने आणि चांदीचे दर वाढलेले राहतील.

सोने आणि चांदीचे गुंतवणूकदार मालामाल

सोने आणि चांदीच्या दरात गेल्या वर्षभरात मोठी वाढ झाली आहे. नववर्षात देखील सोने आणि चांदीच्या दरातील वाढीचा ट्रेंड कायम आहे.  31 डिसेंबर 2024 ला 24 कॅरेट सोन्याचा दर 75 हजारांवर होते. आता सोन्याचा दर 137195 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, चांदीचा दर देखील 31 डिसेंबर 2024 ला चांदीचा एक किलोचा दर 86 हजार रुपयांवर होता. तिथून सोने आणि चांदीच्या दरात वर्षभरात मोठी वाढ झाली आहे.

सोने आणि चांदीच्या दरातील वाढीला विविध घटक कारणीभूत आहेत. जागतिक राजकारणातील तणाव वाढला की गुंतवणूकदार सोन्यातील सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देतात. सध्या अमेरिकेनं आक्रमक धोरण स्वीकारलं आहे. व्हेनेझुएलावर हल्ला करत तिथल्या राष्ट्रपतींना त्यांनी अटक केली. या सर्व घडामोडींचा परिणाम सोने दरावर होत असतो. तर, चांदीचा औद्योगिक वापर वाढल्यानं मागणी वाढलीय.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.