आपल्या सनातन धर्मात एकादशीची तिथी खूप खास मानली जाते. ही तिथी जगाचे पालनपोषण करणाऱ्या भगवान विष्णूला समर्पित असल्याने अनेक भाविकभक्त प्रत्येक महिन्याला येणाऱ्या एकादशीचे मनोभावे पूजा करतात. तर एकादशीला भगवान विष्णूची विशेष पूजा आणि उपवास केला जातो. वर्षभरात 24 एकादशी व्रत असतात. पहिली एकादशी महिन्याच्या कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात येते. मान्यतेनुसार एकादशी हे भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळविण्याचा एक विशेष प्रसंग आहे. या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होतो.
एकादशीचा उपवास आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येते. संकटे दूर होतात. शिवाय मृत्यूनंतर एकादशीचे व्रत केल्याने मोक्ष मिळतो आणि भगवान विष्णूच्या वैकुंठ स्थानी स्थान मिळते. तथापि अनेक लोकांना प्रश्न पडतो की 24 एकादशी व्रतांपैकी कोणती एकादशी व्रत सर्वात महत्वाची आहे? चला सर्वात महत्वाच्या एकादशी व्रताबद्दल तसेच या वर्षी तो कधी साजरी केली जाईल ते आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.
निर्जला एकादशीधार्मिक शास्त्रांनुसार, ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी सर्वात महत्त्वाची मानली जाते. या एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात. या एकादशीला व्रत करणारी व्यक्ती पाणी देखील पित नाही, म्हणूनच याला निर्जला एकादशी म्हणतात. असे मानले जाते की निर्जला एकादशीचे व्रत केल्याने वर्षभरातील सर्व एकादशीच्या व्रतांचे फळ मिळते. या वर्षी निर्जला एकादशी 25 जून रोजी साजरी केली जाईल.
देवउठनी एकादशीदेवउठनी एकादशीला देवोत्थान किंवा प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. ही एकादशी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात उज्ज्वल पंधरवड्यात येते. हा दिवस भगवान विष्णू त्यांच्या चार महिन्यांच्या योगिक निद्रामधून जागे होतात म्हणजेच या एकादशीच्या दिवशी चातुर्मास संपतो. त्यानंतरच शुभ आणि मागंलिक कार्ये पुन्हा सुरू करता येतात. म्हणूनच ही एक महत्त्वाची एकादशी मानली जाते. या वर्षी 21 नोव्हेंबर रोजी व्रत आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)