वेटलिफ्टिंगमध्ये कल्याणच्या हर्षिणी चव्हाणला सुवर्णपदक
esakal January 13, 2026 05:45 AM

वेटलिफ्टिंगमध्ये हर्षिणी चव्हाणला सुवर्णपदक
कल्याण, ता. १२ (वार्ताहर) : अस्मिता खेलो इंडियाअंतर्गत राष्ट्रीय युथ वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या हर्षिणी चव्हाण हिने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. उत्तर प्रदेश येथे नुकतीच ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत १७ वर्षांखालील वयोगटातील ४८ किलो वजनी गटात हर्षिणीने आपले वर्चस्व सिद्ध केले.
वेटलिफ्टिंग स्पर्धेत हर्षिणीने स्नॅचमध्ये ६२ किलो आणि क्लिन अँड जर्कमध्ये ८० किलो असे एकूण १४२ किलो वजन यशस्वीरीत्या उचलत अव्वल स्थान मिळवले. तिच्या तांत्रिक अचूकतेसह ताकदीचे उत्कृष्ट प्रदर्शन पाहून पंच व प्रशिक्षकांनीही कौतुकाची थाप दिली. पुरस्कार वितरण सोहळा भारताची वेटलिफ्टर आणि पद्मश्री पुरस्कार विजेती मिराबाई चानू यांच्या हस्ते पार पडला. हा क्षण प्रेरणादायी ठरला असल्याचे हर्षिणीने सांगितले. हर्षिणी चव्हाण हिच्यावर सर्वच स्तरावरुन शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.