rat१२p४.jpg-
P२६O१७१०६
रत्नागिरी : अभ्यंकर-कुलकर्णी महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रमात बोलताना विभावरी करमरकर. सोबत प्रा. निनाद तेंडुलकर, प्रा. अभिजित भिडे, प्रा. विद्याधर केळकर आदी.
---
स्वामी विवेकानंदांचे विचार दिशादर्शक
विभावरी करमकरक ः स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : आजच्या स्पर्धात्मक युगात स्वामी विवेकानंदांचे विचार विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक आहेत. आत्मविश्वास, शिस्त, राष्ट्रभक्ती व समाजसेवेचे व्रत विद्यार्थ्यांनी स्वीकारावे, असे प्रतिपादन व्याख्यात्या विभावरी करमरकर यांनी केले.
अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. व्यासपीठावर महाविद्यालयाचे पर्यवेक्षक विद्याधर केळकर, माजी एनएसएस कार्यक्रमाधिकारी निनाद तेंडुलकर, कार्यक्रमाधिकारी अभिजित भिडे, सहकार्यक्रमाधिकारी रिद्धी हजारे, वैशाली पाटील उपस्थित होत्या. पर्यवेक्षक विद्याधर केळकर यांनीही स्वामी विवेकानंदांच्या जीवनकार्याचा उल्लेख करून विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.