16931
कुडाळ ः येथील वाचनालयात ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा प्रमाणपत्रांचे वितरण मंगेश मसके आदींच्या हस्ते केले.
ग्रंथपालन परीक्षा प्रमाणपत्रांचे
कुडाळ वाचनालयात वितरण
कुडाळ, ता. ११ ः येथील रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय येथे महाराष्ट्र शासन मान्य ग्रंथपालन परीक्षा प्रमाणपत्र २०२६ आणि २०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मसके यांच्या हस्ते झाले.
डॉ. एस. आर. रंगनाथन आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी जिल्हा ग्रंथालयाचे कार्यवाह डॉ. विवेक पाटणकर, वर्गव्यवस्थापक राजन पांचाळ, वर्गाचे मुख्याध्यापक प्रसाद जाधव आदी उपस्थित होते. श्री. मसके यांनी ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्गाचे महत्त्व सांगितले. जिल्हा संघाचे सहकार्यवाह महेश बोवलेकर यांनी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त पुस्तकाचे महत्त्व याबद्दल माहिती दिली. वाचनालयाचे सदस्य विजय भोगटे, जिल्हा ग्रंथालय संघाचे सदस्य जयेंद्र तळेकर, सतीश गावडे, शिक्षिका प्रियल रणसिंग आदी उपस्थित होते. प्रसाद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. राजन पांचाळ यांनी स्वागत केले.