महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज मंगळवारी थंडावणार आहेत. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अनेक ठिकाणी धक्कादायक घटनाही समोर आल्या आहेत. कल्याण डोंबिवलीत मतदारांना पैशांचं वाटप केलं जात असल्याचा आरोप होत आहे. भाजपच्याउमेदवारांवर शिवसेना शिंदे गटाने केलेल्या आरोपानंतर दोन्ही गट सोमवारी रात्री उशिरा आमने-सामने आले. यातून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यात दोन्ही पक्षाचे उमेदवार जखमी झाले आहेत.
कल्याण डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक २९ मध्ये सोमवारी भाजपकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप झाला. सोमवारी रात्री उशिरा भाजपचे कार्यकर्ते बैठक घेत असल्याची माहिती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना समजली. त्यानंतर कार्यकर्ते थेट बैठकीच्या ठिकाणी पोहोचले आणि रात्री १० नंतर बैठक कशी काय सुरू? आचारसंहिता असताना बैठकीला परवानगी कशी? अशी विचारणा करण्यात आली.
शिवसेनेचा भाजपला 'दे धक्का', राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे गटाला दिली साथभाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यानंतर काही वेळातच दोन्ही गटातला तणाव इतका वाढला की थेट हाणामारी करण्यात आली. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यावर कोयत्यानं हल्ला केला गेला. हल्ल्यात ओमनाथ नाटेकर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यासह भाजपचे ३ आणि शिवसेनेचे २ कार्यकर्तेही जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, संवेदनशील प्रभाग असूनही पोलिसांकडून पुरेसा फौजफाटा तैनात का करण्यात आला नव्हता असा प्रश्न आता उपस्थित होतोय. निवडणुकीत पैसे वाटपाचे आरोप होत असताना त्यावर कारवाई का केली जात नाहीय अशीही विचारणा होत आहे. पोलिसांनी प्रभागात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलायला पाहिजे होती असं स्थानिकांचं म्हणणं आहे.
शब्द उधार घेतो, लाव रे तो व्हिडीओ! फडणवीसांनी ठाकरे बंधूंना त्यांच्याच व्हिडीओतून दिलं उत्तर, ३ मिनिटांचा VIDEO दाखवलाराज्यात आणि कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना भाजप यांची युती आहे. पण प्रभाक क्रमांक २९ मध्ये दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात आहे. या प्रभागातील वादामुळे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत युतीत असलेली अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आलीय.