काही वर्षाआधी कुटूंबातील लोक ज्या व्यक्तीशी लग्न ठरवतील अशा व्यक्तीशी लग्न केलं जायचं. हळूहळू काळ बदलला आणि तरुण-तरुणी स्वत:चा आपला जीवनसाथी निवडू लागले. बिनधास्तपणे एकमेकांशी बोलू लागले, जेणेकरुन भविष्यात अडचणी येणार नाहीत. आता काळानुसार आणखी एक गोष्ट तरुण जोडपी करू लागली आहेत, ते म्हणजे बरेच कपल्स लग्नाआधी हेल्थ चेकअप करू लागले आहेत. यात एक टेस्ट करण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. आज आपण या टेस्टबद्दल जाणून घेऊयात.
प्रजनन चाचणी –
तज्ज्ञांच्या मते, सध्या तरुणांमध्ये कोणालाही न सांगता प्रजनन चाचणी करण्याचे प्रमाण वाढत आहे. लग्नानंतर संभावित होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी अनेकजण आपली फर्टिलिटी टेस्ट करत आहेत. फर्टिलिटी एक्सपर्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार जगभरात स्पर्म (शुक्राणू) ची संख्या घटत आहे. 2022 मध्ये करण्यात आलेल्या एका विश्लेषणात 1973 ते 2018 दरम्यानच्या पुरुषांमध्ये सरासरी स्पर्म काउंटमध्ये 51.6 टक्के घट आढळून आली. तज्ज्ञ पुढे सांगतात की, काळ इतका पुढे येऊन आजही बाळ न होण्यास एका बाईला जबाबदार धरलं जातं. पण काही आकडेवारीनुसार देशातील बाळ न होण्याच्या केसेसमध्ये पुरुष 40 % जबाबदार आहेत.
पुरुष वंध्यत्वाची कारणे –
पुरुषांमध्ये वंध्यत्वाची कारण अनेक आहेत. यात वीर्य कमी होणे, स्पर्मचे कमी उत्पादन, स्पर्मचे असामान्य कार्य ते स्पर्मच्या वितरणास प्रतिबंध करण्यात अडथळा आदींचा समावेश आहे. तथापि, वंधत्वास कारणीभूत असलेले बाह्य घटक असू शकतात. यात स्मोकिंग, अति मद्यपान, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव. लठ्ठपणा, स्ट्रेस, केमिकल्स आणि कीटकनाशकांशी संपर्क… याशिवाय आजारपण, दुखापत, दीर्घकालीन आजार अशीही कारणे आहेत.
हेही वाचा – Relationship- लग्नानंतर पार्टनरच्या स्वभावात बदल का होतो ?