Makar Sankranti 2026 Wishes In Marathi: मकर संक्रांतीला मित्र- मंडळी, प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा !
Marathi January 13, 2026 02:25 PM

हिंदू धर्मात ‘मकर संक्रात’ हा महत्वाचा सण आहे. वर्षाचा पहिला सण मकर संक्रात असतो. हा सण सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरा केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्यदेव त्यांचे पुत्र शनिदेवाच्या घरी येतात अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी दानधर्म, स्नान आणि पूजा करणे याला विशेष महत्त्व आहे. संक्रांतीनिमित्त तुम्ही तुमच्या मित्र- मंडळी, प्रियजनांना खास शुभेच्छा पाठवू शकता… ( Happy Makar Sankranti 2026 Wishes & Quotes in Marathi )

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला !
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,
सूर्यदेवाच्या कृपेने
तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदो,
मकर संक्रांती 2026 च्या हार्दिक शुभेच्छा !

उत्तरायणाचा सण मकर संक्रांती
तिळगुळ, पतंग आणि आनंदाची उधळण,
सर्वत्र उत्साहाचे वातावरण.
मकर संक्रांती 2026 च्या शुभेच्छा !

दु: ख असावे तीळा सारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तीळगुळासारखे
मकर संक्रांत सणाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा !

गोड नाती, गोड सण,
तुम्हाला मिळो खूप समृद्धी आणि धन
तिळगुळ घ्या गोड बोला!

सूर्य उत्तरायणात येतो तेव्हा
नवीन प्रकाश आणि ऊर्जा आणतो,
हा सण तुम्हाला यश, आरोग्य आणि समृद्धी देऊन जावो
तिळगूळ घ्या, गोड बोला आणि नाती अधिक मजबूत करा,
तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा !

तिळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा,
तुमच्या आयुष्यात येवो आनंदाचा नवा ओलावा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

सूर्याची उब आणि नात्यांची साथ,
आनंदी जावो ही संक्रांत !
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.