जळगाव: दोन ते तीन दिवस सोने-चांदीचा भाव स्थिर होता. मात्र, सोमवारी (ता. १२) सोन्याच्या भावात चार हजार २०० रुपयांची वाढ (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी), तर चांदीत १९ हजारांची वाढ प्रतिकिलोमागे (विनाजीएसटी) झाली. पुन्हा एकदा सोने, चांदी वधारल्याने गुंतवणूकदारांचे डोळे वटारले आहेत.
जानेवारी २०२५ मध्ये सोने-चांदीत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना डिसेंबर २०२५ अखेर सोन्यातून (दहा ग्रॅममागे) ५६ हजार ४०० रुपयांचा परतावा मिळाला, तर चांदीतून एक लाख ४७ हजारांचा परतावा मिळाला.
Gold Silver Price Increase : तीन दिवसांत सोने ४ हजार तर चांदी १९ हजारांनी वाढली, आजचा चांदीचा भाव २ लाख ७० हजारांवरविशेष म्हणजे यंदा सोन्याने सर्वाधिक उच्चांक एक लाख ४० हजार प्रतिदहा ग्रॅम (विनाजीएसटी), तर चांदीने एक लाख ८७ हजारांचा उच्चांक प्रतिकिलो (विनाजीएसटी) गाठला होता. इतर गुंतवणुकीपेक्षा सोने- चांदीतील गुंतवणुकीतून सर्वाधिक परतावा मिळतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
८ जानेवारीला सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅम एक लाख ३५ हजार ८०० रुपये होता. त्यात सोमवारी चार हजार २०० रुपयांची वाढ होऊन सोने एक लाख ४० हजारांवर पोहोचले. ८ जानेवारीला चांदीचा भाव दोन लाख ४१ हजार प्रतिकिलो (विनाजीएसटी) होता. त्यात सोमवारी १९ हजारांची वाढ होऊन चांदी दोन लाख ६० हजारांवर पोहोचली आहे.