IND vs NZ : विराटच्या निर्णयाला रोहितची साथ, राजकोट वनडेआधी दोघांचा मोठा निर्णय
GH News January 14, 2026 01:15 AM

भारतीय संघाने रविवारी 11 जानेवारीला न्यूझीलंडला 4 विकेट्सने पराभूत करत 2026 वर्षाची सुरुवात विजयाने केली. भारताने न्यूझीलंड विरूद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे सीरिजमध्ये विजयी सलामी देत 1-0 ने आघाडी मिळवली. अनुभवी फलंदाज विराट कोहली याने भारताला विजयी करण्यात बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली. विराटने 301 धावांचा पाठलाग करताना 93 धावांची खेळी केली. विराटची ही वनडेत 50 पेक्षा अधिक धावा करण्याची सलग पाचवी वेळ ठरली. विराटने या 93 धावांच्या खेळीसह इतिहास घडवला. विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28 हजार धावा करणारा एकूण दुसरा तर पहिला सक्रीय फलंदाज ठरला. तर त्याआधी ओपनिंगला आलेल्या रोहित शर्मा याने 26 धावांच्या खेळीत 2 षटकार लगावत वर्ल्ड रेकॉर्ड उद्धवस्त केला. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम उद्धवस्त केला. विराट आणि रोहित या दोघांनी अशाप्रकारे 2026 वर्षात जबरदस्त अशी ‘ओपनिंग’ केली.

विराट-रोहितचा दुसऱ्या सामन्याआधी निर्णय काय?

आता भारताला सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. दुसरा सामना हा 14 जानेवारीला राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियममध्ये होणार आहे. त्याआधी विराटने सलग दुसऱ्या सामन्यातही तसाच निर्णय घेतला. विशेष म्हणजे विराटला या निर्णयात रोहितचीही साथ मिळाली. विराट आणि रोहितने नक्की काय निर्णय घेतला? हे सविस्तर जाणून घेऊयात.

विराट कोहली दुसऱ्या सामन्यातही आपल्या निर्णयावर कायम राहिला. तसेच आता विराटला रोहितची साथ मिळाली. विराट आणि रोहित या दोघांनी सराव केला नाही. फक्त रोहित आणि विराटच नाही तर इतर खेळाडूंनीही सरावाऐवजी आराम करण्यास प्राधान्य दिलं.

सामन्याआधी सराव किती महत्त्वाचा असतो हे क्रिकेट चाहत्यांना माहितीय. विराट आणि रोहितसारखे अनुभवी खेळाडू कसून सराव करतात. मात्र दुसऱ्या सामन्याआधी झालेला हा सराव ऐच्छिक होता. या सरावात सहभागी होणं बंधनकारक नव्हतं. त्यामुळे रोहित आणि विराटसह बहुतांश खेळाडूंनी सराव केला नाही. विराट त्याआधी पहिल्या सामन्यातील ऐच्छिक सरावात सहभागी झाला नव्हता. तसेच दुसऱ्या सामन्याआधी उपकर्णधार श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा यांनीही सरावाला दांडी मारली.

तसेच या ऐच्छिक सराव सत्रात भारताच्या 9 खेळाडूंनी सहभाग घेतला. या 9 खेळाडूमंध्ये कर्णधार शुबमन गिल आयुष बडोनी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, अर्शदीप सिंह आणि कुलदीप यादव यांचा समावेश होता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.