न्यूझीलंड विरुद्ध नववर्षात विजयी सुरुवात केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी सज्ज झाला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांची मालिका खेळण्यात येत आहे. या मालिकेत भारतीय संघ 1-0 ने पुढे आहे. भारताने 11 जानेवारीला न्यूझीलंडवर सहज विजय मिळवला. त्यानंतर आता चाहत्यांना दुसर्या सामन्याची प्रतिक्षा आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या अनुभवी जोडीने भारताला पहिल्या सामन्यात विजयी करण्यात योगदान दिलं होतं. मात्र विराटचं शतक 7 धावांनी हुकलं. तर रोहितला 26 धावा करुन मैदानाबाहेर जावं लागलं होतं. त्यामुळे भारतीय चाहत्यांना दुसर्या सामन्यात रोहित आणि विराटकडून मोठ्या वादळी खेळीची आशा असणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना कुठे आणि कधी पाहता येणार? हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी 14 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या वेळेत कोणताही बदल करणयात आलेला नाही. दुसऱ्या सामन्याला नियोजित वेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर त्याआधी 1 वाजता टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहता येईल.
दरम्यान न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी आतापर्यंत भारतीय संघात 2 बदल करण्यात आले आहेत. टीम मॅनेजमेंटला हे दोन्ही बदल नाईलाजाने करावे लागले आहेत. विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याला पहिल्या सामन्याआधी दुखापत झाली. त्यामुळे पंतला संपूर्ण मालिकेतून बाहेर व्हावं लागलं. पंतच्या जागी ध्रुव जुरेल याचा समावेश करण्यात आला. त्यानंतर ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याला पहिल्या सामन्यात बॉलिंग करताना झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून माघार घ्यावी लागली. सुंदरच्या जागी युवा आयुष बडोनी याचा समावेश करण्यात आला.