rat१३p३२.jpg-
२६O१७४९७
चंद्रभागा जाधव
-------
लाल किल्ल्यावर तोंडलीच्या सरपंच
प्रजासत्ताक दिनासाठी चंद्रभागा जाधव यांची निवड
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १३ ः देशाच्या राजधानीत, लाल किल्ल्यावर प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या भव्य ध्वजवंदन समारंभास उपस्थित राहण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून मंडणगड तालुक्यातील तोंडली ग्रामपंचायतीच्या सरपंच चंद्रभागा जाधव यांची निवड झाली आहे. केंद्र सरकारकडून त्यांना व त्यांचे पती चंद्रकांत जाधव यांना अधिकृत आमंत्रण प्राप्त झाले आहे.
महिला सरपंच व त्यांचे पती या दाम्पत्याला ही संधी मिळाल्याने मंडणगडचा लौकिक वाढला आहे. चंद्रभागा जाधव सध्या तोंडली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची दुसरी टर्म बजावत असून, यापूर्वीही पाच वर्षे त्यांनी ही जबाबदारी समर्थपणे पार पाडली आहे. राष्ट्रीय पातळीवरील या मोठ्या कार्यक्रमात जिल्ह्यातील दुर्गम भागातील ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा सहभाग होणे ही ग्रामीण नेतृत्वाच्या कार्याची पोचपावती मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकारी सुनील खरात, विस्तार अधिकारी पवन गोसावी, ग्रामपंचायत अधिकारी अक्षय चोपडे तसेच तोंडली गावासह तालुकाभरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.