टिव्ही अभिनेत्री अमृता देशमुखने पुण्यातील नाट्यगृहांवर संताप व्यक्त केला आहे.
अमृताने व्हिडीओ शेअर करून पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराची दुरावस्था दाखवली.
घाणेरडे वॉशरूम आणि थिएटरमधील अस्वच्छतेवर अभिनेत्री बोलली.
आजही नाटकांची तुफान क्रेझ पाहायला मिळते. कलाकार आवडीने नाटक करतात आणि प्रेक्षक प्रेमापोटी नाटक पाहायला जातात. मात्र अनेक काळापासून नाट्यगृहांच्या स्वच्छतेबाबत मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याबद्दल खंत व्यक्त केली आहे. मात्र या परिस्थितीत काही बदल घडताना दिसत नाही. आता ही मराठी लोकप्रिय अभिनेत्री अमृता देशमुखने असाच एक संताप व्यक्त करणारा व्हिडीओ शेअर केला आहे.
View this post on InstagramA post shared by Amruta Deshmukh (@khwabeeda_amruta)
अभिनेत्री अमृता देशमुखचा पुण्यातीलबालगंधर्व रंगमंदिर येथे 'नियम व अटी लागू' या नाटकाच्या प्रयोगाला गेली होती. तेथील नाट्यगृहाची अस्वच्छता, वॉशरूमची घाण परिस्थिती पाहून तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने तेथील परिस्थिती दाखवली आहे. तसेच संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करत आहेत. तिच्या व्हिडीओच्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बालगंधर्वरंगमंदिर हे खूप वेळापासून त्याच्या अस्वच्छतेमुळे चर्चेत आहे.
अमृता देशमुखने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "आर्टिस्ट येतात, मनापासून प्रयोग करतात, निघून जातात...म्हणून किती गृहीत धरावं...साडीत उंदीर काय जातो, डास काय चावतात.. प्रेक्षक नाटकाच्या प्रेमापोटी येतात, जातात... त्यांना पण असंच गृहीत धरायचं ?? कधी बदलणारे ही परिस्थिती ? सांस्कृतिक शहर म्हणायचं आणि तिथल्या एका नावाजलेल्या नाट्यगृहाची ही अवस्था?"
View this post on InstagramA post shared by Amruta Deshmukh (@khwabeeda_amruta)
अमृता देशमुखने व्हिडीओमध्ये म्हटल्याप्रमाणे, पुण्यातल्या कित्येक नाट्यगृहांमध्ये वॉशरूम्स स्वच्छ असतात. बॅकस्टेजला जाताच एक घाणेरडा वास येतो. VIPच्या रूम्स फक्त स्वच्छ असतात. येथे प्रयोगाच्या 5 मिनिटं आधी कर्मचारी स्वच्छता करायला येतात.अमृताने शेअर केलेल्या व्हिडीओत घाण वॉशरूम दिसत आहे. तसेच ती स्वच्छता कर्मचाऱ्याशी बोलताना देखील दिसत आहे.
Bigg Boss Marathi 6 : "मी काय डंबल नाही..."; विशालने केली प्रभूची मस्करी, 'काळू डॉन' बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडला - VIDEO