कोल्हापूर : शहरातील नागरिकांना महापालिका प्रशासनाकडून दर्जेदार सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. शहरी खेडे म्हणून असलेली कोल्हापूरची ओळख आता स्मार्ट सिटी म्हणून करायची आहे. यासाठी नागरी सुविधा देताना पारदर्शी कारभार करणे आमचा अजेंडा आहे.
कोल्हापूर रोल मॉडेल बनविण्याचा आमचा मानस आहे. केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता आहे. कोल्हापूरचा विकास साध्य करण्यासाठी महायुतीला साथ द्यावी, असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
- लुमाकांत नलवडे
उत्तर : कोल्हापूरचा ऐतिहासिक, धार्मिक, औद्योगिक शहर म्हणून मोठा नावलौकिक असूनही म्हणावा तितका विकास झालेला नाही. महापालिकेत जाणाऱ्या नागरिकाचे काम थांबता कामा नये. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नागरिकांसाठी काम करतोय हे विसरून चालणार नाही. नागरिकांना सहज, कमी श्रमात आणि कमी पैशांत सुविधा देण्याचा अजेंडा आहे. शहर देशातील एक क्रमांकाचे करण्याचे व्हिजन आहे.
प्रश्न : रोजगार निर्मितीसाठी तुमचे मॉडेल काय असणार आहे?उत्तर : सर्किट बेंचमुळे सहा जिल्ह्यांतील वकील, पक्षकार येत आहेत. लवकरच सर्किट बेंचचे रुपांतर खंडपीठात होईल. तेथे स्थानिक वकिलांसह इतरांना रोजगार मिळेल. आयटी पार्कमुळे हजारो तरुणांना काम मिळेल. शेंडापार्क परिसरात ४३ हून अधिक शासकीय कार्यालये एकत्रित येत असल्याने परिसरात मोठा रोजगार निर्माण होईल. कन्व्हेंशन सेंटरमुळे मोठ्या कंपन्यांच्या बैठका तेथे होतील. यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी तयार होतील.
Kolhapur Election : तीन वर्षांत काहीच नाही, आता बदल हवा; महायुतीवर टीका करत सतेज पाटील यांचा विकासाचा अजेंडा प्रश्न : पारदर्शक कारभारासाठी काय नियोजन आहे?उत्तर : करप्रणाली ‘ऑनलाईन’ करणार आहोत. प्रत्येक कामासाठी किती कालावधी पाहिजे हे ठरवणार आहोत. त्या-त्या वेळेत ते काम झालेच पाहिजे; अन्यथा अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार आहोत. यातून भ्रष्टाचाराला रोखणे शक्य होईल. पारदर्शी कारभारासाठी ऑनलाईन प्रणाली आणल्यामुळे चिरीमिरी होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. सर्व व्यवहार पारदर्शी झाले पाहिजेत यासाठी आग्रह असणार आहे.
प्रश्न : महापालिका उत्पन्न वाढीसाठी कोणत्या गोष्टी करणार?उत्तर : कमर्शियल आणि पर्यायाने उत्पन्न वाढीसाठी ओपन स्पेसचा वापर केला जाईल. नागरिकांवर बोजा न पडता कोण कोणत्या माध्यामातून उत्पन्न वाढू शकते यावर लक्ष केंिद्रत केले जाईल.
मागील सत्ताधाऱ्यांनी केल्या अनेक चुकामागील सत्ताधाऱ्यांनी अनेक चुका केल्या आहेत. शहरात एका बोळातून प्रवेश झाल्यासारखे वाटते. तेथे आम्ही बास्केट ब्रिज करणार आहोत. येथे ना कचरा उठाव होतो, ना पिण्याच्या पाण्याचे नियोजन आहे. किती वर्षे केएमटीचा आणि कामगारांचा प्रश्न प्रलंबित राहिला, या प्रत्येक प्रश्नावर काम होणे अपेक्षित होते. ते सत्ताधाऱ्यांच्या कालावधीत झालेले नसल्याची टीका पालकमंत्री आबिटकर यांनी केली.