-rat११p३३.jpg-
२६O१६९८१
देवरूख ः अभिरुचीच्या स्वरोत्सव मैफलीत गायन करताना पंडित व्यंकटेश कुमार.
-----
देवरुखात अभिरुचीची मैफल रंगली
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. १३ ः देवरुखात अभिरुचीतर्फे आयोजित वार्षिक ‘स्वरोत्सव’ची सुरुवात पंडित व्यंकटेश कुमार यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने झाली. त्यांना हार्मोनिअमवर सुयोग कुंडलकर आणि तबलावर प्रशांत पांडव यांनी उत्कृष्ट साथ केली. राग यमन, शंकरा, तिलक कामोद, मिश्र खमाज यांसारख्या विविध रचनांनी मैफलीत रंग भरले. कलाकारांचे सत्कार आणि रसिकांच्या उत्साहाने कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.
सुरुवातीलाच कोकणगंधर्व स्वराधिराज राजाभाऊ शेंबेकर यांच्या हस्ते पंडित व्यंकटेश सुमार यांचा शाल श्रीफळ, अत्तर कुपी आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अभिरुची संस्थेचे उपाध्यक्ष कुंदन कुलकर्णी आणि प्रसाद गानू यांच्या हस्ते सर्व कलाकारांचे स्वागत पुष्पगुच्छ, अत्तरकुपी आणि स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आले.