Marathi Sankranti Rituals and Customs: हिंदू धर्मात मकर संक्रांतीला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. या सणाचा थेट संबंध सूर्यदेवाशी जोडलेला आहे. सूर्य वर्षभरात १२ राशींमधून भ्रमण करतो आणि ज्या दिवशी तो मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाते. यंदा हा सण १४ जानेवारी रोजी साजरा होणार आहे.
परंपरेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ-गूळ, तीळ-गुळाचे लाडू आणि वडी एकेमकांना दिली जाते. याशिवाय संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत सुवासिनी हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात आणि एकमेकींना वाण म्हणजेच भेटवस्तू देतात.
मात्र संक्रांतीची अजून एक खासियत आहे. महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या दिवशी नवविवाहित जोडपं, लहान बाळ आणि प्रेग्नन्ट महिला काळ्या रंगाचे कपडे घालतात आणि त्यावर हलव्याचे म्हणजेच तिळगुळाचे दागिने घालतात. बाजारात याचे नवनवीन ट्रेंडही पाहायला मिळतात. पण मकर संक्रांतीला हे दागिने का घातले जातात, यामागची परंपरा आणि त्याचा अर्थ अनेकांना माहीत नसतो. चला, या रितीमागील कारणे समजून घेऊया.
Makar Sankranti 2026: वर्षभर भरभराटीसाठी संक्रांतीच्या दिवशी 'या' चुका करणं टाळाच हळव्याचे दागिने म्हणजे काय?हलवा या शब्दाला गोडव्याचे प्रतीकी मानले जाते, तर दागिने सौभाग्य आणि सौंदर्याचं प्रतीक दर्शवतात. म्हणूनच हलव्याचे दागिने गोडवा, समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे जर कोणी आयुष्याची नवीन सुरुवात करून हा सण आला असेल आणि त्यांनी हे दागिने घातले तर वर्षभर आनंद आणि गोडवा राहील अशी भावना असते.
कशी सुरु झाली ही परंपरा?मकर संक्रातीला ठोस अशी परंपरा नाही पण मकर संक्रांती कापणीचा सण असल्यामुळे या काळात शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळतं. त्यामुळे या आनंदाच्या क्षणी गोड पदार्थांचा आणि सजावटीचा वापर करण्याची प्रथा निर्माण झाली. म्हणून मराठी संस्कृतीत हलव्याचे दागिने घालणे ही एक जुनी आणि खास परंपरा मानली जाते. नवविवाहित जोडपं, प्रेग्नन्ट महिला आणि लहान बाळांना हे दागिने त्यांच्या आयुष्यात सुख, आरोग्य आणि समृद्धी नांदावी म्हणून घातले जातात.
New Year 2026: नववर्षाची सुरुवात पॉझिटिव्ह करायची असेल तर पुण्यातील 'या' मंदिरांना नक्की भेट द्या या दागिन्यांमध्ये काय समाविष्ट असतं?हलव्याच्या दागिन्यांमध्ये गळ्यातले हार, कानातले, मुकुट, नथ, बाजूबंद, केसांसाठी दागिने, कमरपट्टा, बांगड्या आणि अंगठी यांचा समावेश असतो. लहान आकाराच्या, पांढऱ्या, गोड हलव्याला कृत्रिम दागिन्यांसोबत सजवून हे दागिने तयार केले जातात.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.