Bhogi Vegetable : शेतकऱ्यांची भोगीची आशा: ढगाळ वातावरण, रोगराई आणि भोगी सण, जयसिंगपूर बाजारात भाजीपाल्याच्या दरांचा खेळ
esakal January 14, 2026 08:45 AM

जयसिंगपूर : सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गाजराचे उत्पादन झाल्यामुळे मिरज तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर जयसिंगपूरच्या बाजारात गाजराची आवक झाली. परिणामी दर गडगडले, तर वांगी, वरण्याचे दर मात्र गगनाला भिडलेत.

गाजर २० ते २५ रुपये किलो, तर वांगी, वरण्याला प्रतिकिलो ८० ते १०० दर मिळाला.मंगळवारी (ता. १३) होणाऱ्या भोगी सणासाठी वांगी, वरण्याचे दर गगनाला भिडले आहे. मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या आवकेमुळे गाजराचा दर मात्र गडगडले.

Belagavi Bhogi Festival : कडक भाकरीपासून मलिद्यापर्यंत; भोगीच्या चुलीवर शिजणारी परंपरा : बेळगावच्या ताटातून उमटणारी तीन राज्यांची चव

वांगी वरणा ८० ते १०० रुपये, किलो हरभऱ्याची पेंडी ८ ते १० रुपयांना तर सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर गाजराची आवक झाल्याने दर प्रतिटन २५ ते ३० रुपयावर आले आहेत. रविवारी जयसिंगपूरच्या आठवडा बाजारात भोगीच्या सणासाठी लागणाऱ्या भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री झाली आहे.

शिरोळ तालुक्यातील विविध गावांतून शेतकरी थेट भाजीपाला विक्रीसाठी शहराच्या बाजारपेठेत दाखल झाले होते, तर सांगली जिल्ह्यातील खास करून मिरज तालुक्यातील शेतकरी व व्यापारी मोठ्या प्रमाणावर गाजराची विक्री करताना दिसले. रविवारच्या बाजारात सुमारे आठ ते दहा टेम्पो गाजरांची आवक झाली. त्यामुळे गडगडले.

Makar Sankranti Festival : निवडणुकांमुळे भोगीच्या भाज्यांवर ‘संक्रांत’! महिला प्रचारात व्यग्र असल्याने मागणी मंदावली; भावातही घट

सोमवारी ही मोठ्या प्रमाणावर गाजरांची बाजारात आवक झाली. परिणामी दरही कमी राहिले. भोगी सणासाठी मोठ्या प्रमाणावर वांगी, वरणा, गाजर, हरभरा, कांदापात यांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. भोगीसाठी गाजर वगळता अन्य भाजीपाल्यांना चांगला दर मिळाला.

वरणा, वांगी, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजारात बसून विक्री करणारे शेतकऱ्यांना चार पैसे जादा नफा झाला आहे, तर मार्केटमध्ये सौद्याला लावणारे शेतकऱ्यांच्या पदरी काहीशी निराशा आली. सोमवारी शहरातील बाजारात मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची विक्री होताना दिसली. रविवारी आठवडा बाजाराच्या दिवशी असलेले दर किंचित कमी झाले.

ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्यावर रोगराई

काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला पिकांवर रोगराई पसरली आहे, मात्र भोगीच्या पार्श्वभूमीवर चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी महागडी औषधे फवारून पिके जगवली आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.