वडगाव मावळ, ता. १३ : येथील मिलिंद युवक मंडळ व संघमित्रा महिला मंडळ यांच्या वतीने राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. मिलिंदनगर येथील बुद्धविहारमध्ये हा कार्यक्रम झाला. प्रारंभी त्रिशरण, पंचशील, बुद्ध वंदना झाली. त्यानंतर दोन्ही महामातांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष संभाजी मोरे, प्रकाश गायकवाड, कोंडिबा भालेराव, शंकर चव्हाण, सुभाष ओव्हाळ आरती ओव्हाळ, अर्चना भालेराव, संघमित्रा महिला मंडळाच्या विश्वस्त सीमा ओव्हाळ, सविता सोनावणे, ललिता टपाले, वैशाली ओव्हाळ, स्नेहा सोनवणे, आस्था ओव्हाळ, ओवी ओव्हाळ, सारिका आल्हाट, सुनीता ओव्हाळ, सीमा ओव्हाळ, वैशाली ओव्हाळ आदी उपस्थित होते. संभाजी मोरे, प्रकाश गायकवाड यांनी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. सविता सोनावणे यांनी आभार मानले.
---
वडगाव मावळ : राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करताना उपासक.
-----