पंढरपूर (सोलापूर) : नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर आणि मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये (Pandharpur Municipal Elections) भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन जातीमध्ये तेढ निर्माण करुन नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली, असा गंभीर आरोप पंढरपूरचे भाजपचे आमदार समाधान आवताडे (Samadhan Awatade) यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केला.
यापूर्वी पंढरपूर-मंगळवेढा शहर विकास आघाडीचे प्रमुख उमेश परिचारक यांनाही भालकेंवर जातीयवादाचा आरोप केला होता. त्यानंतर आज आमदार समाधान आवताडे यांनीही भालकेंवर निशाणा साधला.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर आमदार आवताडे यांनी पराभवाविषयी पंढरपुरात पत्रकार परिषदेत भाष्य केले. आमदार आवताडे म्हणाले की, पंढरपूर नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी भालके गटाने भाजप उमेदवाराबद्दल फेकनेरिटिव्ह पसरवण्याचे काम केले. याच दरम्यान भगीरथ भालके व त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकांना भावनिक करुन आणि जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांना यश आले.
Malegaon Municipal Election : आमदार मौलाना मुफ्तींचा बालेकिल्ला धोक्यात? 'सपा'चे मोठे आव्हान, अन्सारी समाजाची भूमिका ठरणार निर्णायकपरंतु, केवळ निवडणुका जिंकण्यासाठी जातीचा आधार घेणे हे कोणत्यात समाजासाठी किंवा जातीसाठी ही बाब चांगली नाही. केवळ राजकारणात सत्ता मिळवण्यासाठी जातीयतेचे विष पेरणाऱ्या लोकांना वेळीच मतदारांनी रोखण्याची गरज आहे. केवळ जातीयवाद आणि भावनिकतेवर राजकारण होत नाही. विकास महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी सांगितले.
दोन्ही नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. परंतु, विरोधी गटाचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. आम्ही विकास कामांना कुठेही विरोध करणार नाही. जे आमच्या सोबत येतील त्यांचे ही आम्ही स्वागत करु, असेही आमदार आवताडे यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी उपसभापती विजयसिंह देशमुख, नगरसेवक भैय्या कळसुले, शंकर सुरवसे आदी उपस्थित होते.
Malegaon Municipal Election : माजी उपमहापौराच्या पोराला रोखण्यासाठी वेगळी खेळी; मालेगावात राजकीय डावपेच, AIMIM च्या अब्दुल मलिकांसमोर मोठं आव्हान 'विधानसभेला भालकेंचे आव्हान राहणार नाही'पंढरपूर नगराध्यक्षपदी प्रणिता भालके या निवडून आल्या असल्या तरी विधानसभेला त्यांचे आव्हान राहणार नाही. आज पर्यंत मी अनेक आव्हानांना तोंड दिले आहे. नगरपालिका निवडणुकीत काही वेगळ्या कारणांमुळे विरोधकांची फावले आहे. यापुढे अशी परिस्थिती राहणार नाही. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्याच्या विकासासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक आणि मी स्वतः कोट्यवधी रुपयांचा विकास निधी खेचून आणला आहे. त्यातून विकास कामे मार्गी लागली आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रणिता भालके मैदानात उतरल्या तरी त्यांचे आव्हान मी मानत नाही. शेवटी लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा सर्वांना अधिकार आहे. मतदारांचा माझावर विश्वास आहे. त्यामुळे मला चिंता नसल्याचेही आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.
पंढरपुरात कॉरिडॉर होणारच!विठ्ठल मंदिर परिसरात कॅरिडाॅर केला जाणार आहे. परंतु, स्थानिक बाधीत लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही काम केले जाणार नाही. काही लोक केवळ राजकारण करण्यासाठी विरोध करत आहेत. अशा लोकांना आम्ही विचारात घेत नाही. परंतु, ज्यांची घरे आणि दुकाने बाधीत होणार आहेत. अशा लोकांची मते विचार घेऊनच काम केले जाणार आहे. परंतु, काॅरिडाॅर होणार असल्याचे ही आमदार आवताडे यांनी ठामपणे सांगितले.