या संक्रांतीला खास बनवण्यासाठी 5 मिनिटांत बनवा 5 प्रकारचे पॉपकॉर्न, जाणून घ्या रेसिपी
admin January 14, 2026 11:24 AM
[ad_1]

मक्रर संक्रांत सणानिमित्त प्रत्येक घरात तिळाचे लाडु बनवले जातात. घराघरात तिळाच्या लाडवांचा गोड वास दरवळत असतो. कारण संक्रांतील तीळाला खास महत्त्व असते. या दिवशी मकर संक्रांत आणखीन खास करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे गोड पदार्थ बनवले जातात. पण यंदाच्या मकर संक्रातीला तुम्ही झटपट असे लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारे पॉपकॉर्न तेही 5 प्रकारच्या फ्लेवर्डमध्ये बनवा. या वेगवेगळ्या फ्लेवर्डचे पॉपकॉर्न या उत्सवांना आणखी कुरकुरीत आणि आनंददायी बनवतील.  चला तर मग आजच्या लेखात आपण 5 प्रकारच्या फ्लेवर्डचे पॉपकॉर्न कसे बनवू शकता ती रेसिपी जाणून घेऊयात.

1. बटर पॉपकॉर्न:

साहित्य:

मक्याचे दाणे

बटर

मीठ

बनवण्याची पद्धत:

1. एका पॅनमध्ये बटर गरम करा. त्यात मक्याचे दाने टाकून मीठ टाका आणि झाकण ठेवा. सर्व पॉपकॉर्न फुटेपर्यंत अधूनमधून ढवळत राहा.

मऊ आणि बटरयुक्त पॉपकॉर्न खाण्यास तयार आहेत.

2. चॉकलेट पॉपकॉर्न

साहित्य:

पॉप्ड बटर पॉपकॉर्न

बटर

चॉकलेट सॉस

व्हॅनिला एसेन्स

बनवण्याची पद्धत:

1. बटर गरम करा. त्यात चॉकलेट सॉस आणि व्हॅनिला टाका आणि नीट ढवळून घ्या. त्यानंतर त्यात मक्याचे दाने टाका आणि फेटून घ्या. सर्व पॉपकॉर्न फुटेपर्यंत अधूनमधून ढवळत राहा.

चॉकलेट पॉपकॉर्न हे मुलांचे आणि मोठ्यांचे आवडतं आहे.

३. नमकीन पॉपकॉर्न

साहित्य:

मक्याचे दाने

तेल

हळद

मीठ

कसे बनवायचे:

1. तेल गरम करा. मीठ आणि हळद टाका आणि मक्याचे दाणे मिक्स करा, झाकण ठेवा आणि सर्व पॉपकॉर्न फुटेपर्यंत ढवळा.

जर तुम्हाला गोड पदार्थ नको असतील किंवा हलका नाश्ता आवडत नसेल तर हा एक उत्तम पर्याय आहे.

4. मसाला पॉपकॉर्न

साहित्य:

नमकीन मक्याचे दाने

तेल

मिरची पावडर

मसाला

कसे तयार करावे:

१.  तेल गरम करा. मसाले टाकून मक्याचे दाने मसाल्यात पॉपकॉर्नमध्ये चांगले मिक्स करा.

जर तुम्हाला चवीला थोडासा मसाला आवडत असेल तर मसाला पॉपकॉर्न परिपूर्ण आहे.

टोमॅटो पॉपकॉर्न

साहित्य:

नमकीन मक्याचे दाने

तेल

टोमॅटो सॉस

मिरची पावडर

कसे बनवायचे:

1. तेल गरम करा. नमकीन मक्याचे दाने टाकून त्यात टोमॅटो सॉस आणि मिरची पावडर टाका आणि चांगले मिक्स करा.

टीप: हे तयार पॉपकॉर्न लगेच खा, काही वेळाने ते मऊ होऊ शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.