बीएमसी निवडणूक 2026 पाडू मशीन: निवडणूक आयोगाने आता एक PADU नावाचं नवीन मशीन आणलं आहे. प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट (PADU) मशीन असं त्याचे नाव आहे. ते उद्या सगळीकडे ठेवलं जाणार आहे. ईव्हीएम बंद पडलं, तर हे मशीन वापरलं जाणार आहे. पण याबाबत कोणतीही माहिती निवडणूक आयोगाने दिली नव्हती. ईव्हीएमला नवं मशीन जोडण्यासंबंधी आधी का माहिती दिली नाही?, असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केला. तर PADU मशीन अपवादात्मक परिस्थितीमध्ये वापरलं जाणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.
PADU मशीन मुंबईत कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही. अपवादात्मक (इमरजेंसी) परिस्थितीमध्ये हे PADU मशीन वापरलं जाईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. ईव्हीएम मशीनला बॅकअप म्हणूण हे मशीन गरज पडली तर वापरलं जाईल. ईव्हीएम मशीन अचानक बंद झाली किंवा तांत्रिक अडचण आली तर हे मशीन वापरलं जाईल, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली.
1. काल 5 वा. प्रचार संपला,आज प्रचाराला मुभा कशी दिली?
2. आतापर्यंतच्या निवडणुकीतील प्रचाराची प्रथा यावेळी का मोडली?
3. मतदानाच्या आदल्या दिवशीही भेटण्याचे अधिसूचना आज का काढली?
4. प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट अर्थात ‘पाडू’ नावाचे नवे मशिन का जोडताय?
5. ‘पाडू’ नावाच्या मशिनबद्दल राजकीय पक्षांना माहिती का दिली नाही?
6. सरकारला हव्या त्या गोष्टी करण्यासाठी आयोग आहे का?
आणखी वाचा