सध्या डेटिंगचा जमाना सुरू आहे. तरुणांपासून ते अगदी वयस्करांपर्यंत अनेकजण डेटवर जाताना दिसतात. अशा वेळी एक गोष्ट दिसून येते की, बहुतेक वेळा बिल भरण्याची जबाबदारी पुरुषांकडेच असते. असं का घडतं, यामागचं नेमकं काय कारण आहे ते आपण जाणून घेऊया.
पूर्वी पुरुष कमावते होते आणि स्त्रिया घर सांभाळत होत्या त्यामुळे बिल भरणं हे पुरुषाचं कर्तव्य मानलं जायचं. यामुळे अनेक ठिकाणी पुरुषांनी बिल भरणं हे सभ्यतेचं आणि काळजीचं लक्षण समजलं जातं. चित्रपट, जाहिराती आणि परंपरांमुळे ही अपेक्षा आजही टिकून आहे. “पुरुषांनीच बिल भरावं” ही अपेक्षा आर्थिक आणि मानसिक दबाव टाकणारी आहे. मात्र आत्ताच्या काळात दोघंही कमावते असतील, तर दोघंही बिल भरू शकतात. यामुळे कोणी बिल भरायचं हे परस्पर समजुतीवर असायला हवं.
आजच्या काळात अनेक योग्य पर्याय आहेत
1. बिल समान वाटून घेणं (Split bill)
आजच्या काळात डेटिंगमध्ये बिल भरण्याबाबत अनेक योग्य आणि समतोल पर्याय उपलब्ध आहेत. सर्वात सामान्य आणि स्वीकारार्ह पर्याय म्हणजे बिल समान वाटून घेणं (Split Bill). यामुळे दोघांवरही आर्थिक भार समान राहतो आणि कोणावरही जबाबदारी लादली जात नाही.
2. बिलआळीपाळीने भरणं
दुसरा योग्य पर्याय म्हणजे आळीपाळीने बिल भरणं. एकदा कोणी बिल भरलं, तर पुढच्या भेटीत दुसऱ्याने भरणं. यामुळे नात्यात समजूतदारपणा आणि समतोल टिकून राहतो.
3. मोकळेपणाने बोलून ठरवणं सर्वात योग्य आहे
तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा पर्याय म्हणजे मोकळेपणाने बोलून ठरवणं. स्पष्ट संवादामुळे गैरसमज टाळता येतात आणि दोघांनाही सोयीस्कर असा निर्णय घेता येतो. शेवटी, नात्यातील आदर आणि समानतेसाठी संवाद हाच सर्वात योग्य मार्ग ठरतो.