NEET PG 2025 Allows MD MS Admission Even With Minus 40 Marks देशात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेसने नीट पीजी २०२५साठी पात्रता कटऑफ कमी केला आहे. सुधारित निकषांनुसार आता खुल्या वर्गासाठी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी पात्रता ५० टक्क्यांपेक्षा कमी करून ७ टक्के केलीय. तर एससी, एसटी आणि ओबीसी उमेदवारांसाठी ४० टक्क्यांवरून ० करण्यात आली आहे. दिव्यांगांच्या जनरल कॅटेगरीसाठी ४५ टक्क्यांवरून ५ टक्के केली आहे. नीट पीजी २०२५ काउन्सिलिंगचे दोन राउंड झाल्यानंतर सरकारी आणि खासगी वैद्यकीय कॉलेजमध्ये १८ हजारांपेक्षा जास्त पीजीच्या जागा रिकाम्या आहेत.
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी पात्रता टक्केवारी कमी करून शून्य करण्यात आलीय. या निर्णयानंतर नीट पीजी २०२५मध्ये ८०० पैकी मायनस ४० गुण मिळालेले उमेदवारही पदव्युत्तर मेडिकल कोर्सेस एमडी आणि एमएस या अभ्यासक्रमासाठी काउन्सिलिंगच्या तिसऱ्या राउंडमध्ये भाग घेऊ शकतात. कटऑफचा स्कोअर २३५ वरून कमी करून तो थेट मायनस ४० करण्यात आलाय.
६०० खोल्यांचे आलिशान हॉटेल्स, १० हजार कोटींची मालमत्ता; मेवाड राजघराण्यात वादाचा भडका, मृत्यूपत्रावरून भावंडांची लढाई कोर्टातकटऑफ कमी केल्याचा अर्थ असा की राखीव प्रवर्गातील सर्व उमेदवार ज्यांनी नीट पीजी २०२५ची परीक्षा दिली होती ते आता एमडी, एमएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला पात्र आहेत. एनबीईएमएसने सांगितलं की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आदेशावरून हा निर्णय घेण्यात आला आहे. जानेवारीत आरोग्य मंत्रालय आणि एनबीईएमएसने या सदंर्भात अहवाल सादर केला होता. यानंतर आता तिसऱ्या राउंडमध्ये कटऑफ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.