वाशीम : नगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व भारतीय जनता पक्षात थेट सामना झाला होता. मात्र, या राजकीय लढाईतील सैनिक अजून स्थिरावले नसताना सत्तेसाठी दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले आहेत. वाशीम नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी ठाकरे सेनेचे नगरसेवक राजू भांदुर्गे यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदासाठी भाजपकडून उमेदवारी न दिल्याने ठाकरे सेनेला अप्रत्यक्ष मदत मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!नगरपरिषदेतील संख्याबळ लक्षात घेता उपाध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली होती. मात्र, ठाकरे सेनेतर्फे राजू भांदुर्गे यांनी एकमेव अर्ज दाखल केल्याने निवडणूक बिनविरोध झाली. नगरपरिषदेत भाजप व ठाकरे सेनेचे नगरसेवक बहुमतात असले तरी, भाजपने उपाध्यक्षपदासाठी उमेदवार उभा न केल्याने समीकरणे बदलली. अलीकडील नगरसेवक निवडणुकीत भाजपचे १४, ठाकरे सेनेचे १३ नगरसेवक निवडून आले असून, काँग्रेसचे दोन, तर एमआयएमचे दोन नगरसेवक विजयी झाले आहेत. त्यामुळे उपाध्यक्षपदासाठी १७ मतांचा आकडा आवश्यक होता. एमआयएमचे दोन नगरसेवक निवडणूक प्रक्रियेत उपस्थित नसल्याने ठाकरे सेनेचा मार्ग सुकर झाला.
दरम्यान, नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी उबाठा गटाचे रेखा सुरेश मापारी, भाजपकडून गणेश खंडाळकर व निलेश जीवनानी यांची निवड झाली आहे. भाजपने उपाध्यक्षपदासाठी उमेदवार न दिल्याने अध्यक्षपदाच्या निवडीत ठाकरे सेनेने केलेल्या सहकार्याची परतफेड असल्याची चर्चा आहे.
विरोधी पक्ष म्हणून मजबूतवाशीम नगरपालिकेत सर्वच पक्ष मिळून सत्ता राबवितात हा या पालिकेचा गेल्या २० वर्षाचा इतिहास आहे. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रूपाने मजबूत विरोधी पक्ष पालिकेत निर्माण झाला होता. मात्र, सत्तेच्या खेळात एकमेकांविरुद्ध लढलेल्या भाजप व उबाठा या दोन्ही पक्षांनी एकमेकांसमोर लोटांगण घातल्याने सामान्य कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे.
माेठी बातमी! शक्तिपीठ महामार्गाचा नवा आराखडा ‘व्हायरल; उत्तर सोलापूर, सांगोला वगळून माढा, माळशिरसमधून जाणार ! ...तरीही भाजप समोर लोटांगणया निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे १३ नगरसेवक होते, तर उबाठा व काँग्रेसचे १५ नगरसेवक उपस्थित असताना उबाठा पक्षाने स्वीकृत नगरसेवक निवडीत भाजसमोर लोटांगण का घातले हे न सुटणारे कोडे झाले आहे. मुख्य म्हणजे एआयएमआयएमचे दोन नगरसेवक गैरहजर राहिले होते. ही भाजपची खेळी की, शिवसेनेची रणनीती याबाबत चर्चा रंगत आहेत. काँग्रेसला बाहेर ठेवण्याच्या नादात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष भाजपच्या वळचनिला गेला असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटत आहेत.