ज्याची भीती होती तेच झालं, डोनाल्ड ट्रम्प यांचा आतापर्यंत सर्वात मोठा निर्णय, काही तरी भयंकर घडणार, जगभरात खळबळ
Tv9 Marathi January 16, 2026 05:45 AM

अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढतच चालला आहे. याचदरम्यान आता अमेरिकेचं संरक्षण मंत्रालय पेंटागॉनने मोठा निर्णय घेतला आहे. आता अमेरिकेनं मध्यपूर्वेत आपलं नौवदल तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण चीनच्या समुद्रात तैनात असलेल्या एका वाहक स्ट्राईक ग्रुपला संपूर्ण मध्यपूर्वेमध्ये तैनात करण्यात येणार आहे. या ग्रुपमध्ये यूएसएस अब्राहम लिंकन विमानवाहू जहाज आणि अनेक युद्धनौकांचा समावेश आहे. या संपूर्ण ग्रुपला मध्यपूर्वेत पोहोचण्यासाठी अजून एक आठवड्याचा कालावधी तरी लागेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अमेरिकेचा लिंकन स्ट्राईक ग्रुप किती शक्तिशाली?

अब्राहम लिंकन विमानवाहू युद्धनौका ही जगातील सर्वात शक्तिशाली युद्धनौका मानली जाते. ती अणुऊर्जेवर चालते. या युद्धनौकेचं वजन एक लाख टनांपेक्षाही अधिक आहे. या युद्धनौकेवर एकाचवेळी पाच हजार सौनिक तैनात करता येतात एवढी प्रचंड क्षमता या युद्धनौकेची आहे. या युद्धनौकेद्वारे 60 ते 65 फायटर जेट तैनात आहेत. यामध्ये F/A-18 फायटर जेट, रडारवर नियंत्रण ठेवणारी विमानं आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर एअरक्राफ्टचा समावेश आहे. या युद्धनौकेची क्षमता एवढी प्रचंड आहे, की एका छोट्या देशाच्या आर्मी एवढी या एका युद्धनौकेची ताकद आहे. कोणत्याही बाह्य मदतीशिवाय अनेक महिने ही युद्ध नौका कोणत्याही देशासोबत युद्ध करू शकते.

दरम्यान दुसरीकडे अमेरिकेनं इराणवर हल्ल्याचा पूर्ण प्लॅन तयार केला असल्याची माहिती समोर येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना इराणवर कोणत्या मार्गाने हल्ला करायचा याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. इराणविरोधात अमेरिका फक्त एअर स्ट्राईकच नाही तर सैन्य, सायबर यासारख्या हल्ल्यांची देखील तयारी करत आहेत.

दरम्यान आज सलग 18 दिवस आहे, इराणमध्ये संघर्ष सुरूच आहे. तेथील सरकारविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनामध्ये आतापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे. इराणमध्ये मोठं अराजक निर्माण झालं असून, याविरोधात आता अमेरिकेनं आक्रमक भूमिका घेतली आहे, त्यामुळे इराण आणि अमेरिकेमधील संघर्ष प्रचंड वाढला आहे. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.