Bigg Boss Marathi 6 : इंग्रजी झाडणाऱ्या दिव्याला अनुश्रीने शिकवला मराठीचा धडा ! प्रेक्षक म्हणाले "हिला असंच पाहिजे"
esakal January 17, 2026 03:45 AM

Bigg Boss Marathi Latest Promo : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 6 चांगलाच चर्चेत आहे . या सीजनचा नवीन प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा प्रोमो पाहून प्रेक्षक चांगलेच खुश झाले आहेत.

घरात बिग बॉसने सदस्यांवर नवीन कार्य सोपवलं. या कार्यादरम्यान दिव्या शिंदे आणि अनुश्री माने यांच्यात चांगलंच भांडण झालं. काय घडलं नेमकं आणि प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊया.

प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की, टास्कदरम्यान अनुश्री दिव्याला "काय करायचं ते तू नको सांगू" असं म्हणते त्यावर दिव्या "मी माझं सांगतेय. You are not suppose to tell me." असं म्हणते. त्यावर अनुश्री "हा मराठी बिग बॉस आहे इथे मराठीत बोलायचं." त्यावर दिव्या "तू मला नको सांगू" असं उत्तर देते. अनुश्री तिला "इंग्रजीमध्ये बोलायचं तर इंग्लिश बिग बॉसमध्ये जा" असं म्हणते. तर दिव्या "तू मला सांगायची गरज नाही"असं म्हणते.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)